शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पब्लिकच्या मेरिटवरच तिकीट; नितीन गडकरींच्या इशाऱ्याने भाजप नगरसेवकांना 'टेन्शन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 11:29 IST

नागपूर महापालिकेतर्फे आयोजित नागपूर सत्कार कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

नागपूर : सामान्य नागपूरकरांचा नगरसेवकांवरील रोष विचारात घेता भाजपच्या ६० टक्के नगरसेवकांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. त्यात प्रभागातील नागरिक म्हणतील त्याच नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. यामुळे मागील पाच वर्षांत प्रभागात न फिरकणाऱ्या नगरसेवकांचे टेन्शन वाढले आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नितीन गडकरी मात्र आपला गृह जिल्ह्यातील गड वाचविण्यासाठी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, नागरी सत्कार अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत आहेत. शुक्रवारी आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात गडकरी म्हणाले, चांगले काम करणाऱ्यांना संधी मिळते. राजकारण मेट्रोसारखे आहे. स्टेशन आले की प्रवासी उतरतात, नवीन बसतात. राजकारणात माझ्याशिवाय दुसरा नवीन कुणीही येऊ नये, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण जनता हुशार आहे. तोंडावर कौतुक करतात. मात्र, मतदान पेटीतून कुणाला कौल द्यायचा हे त्यांना माहीत आहे. नगरसेवकांकडून लोकांना अपेक्षा असतात. पण नगरसेवक प्रभागात दिसलाच नाही तर पुन्हा निवडून कसा येणार, असा सवाल गडकरी यांनी केला.

नितीन गडकरी व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते महामेट्रोचे प्रबंध निदेशक ब्रिजेश दीक्षित, सोलर इंडस्ट्रीजचे प्रबंध निदेशक सत्यनारायण नुवाल, राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता श्रीनभ अग्रवाल, ज्युनिअर ग्रँडमास्टर चेस संकल्प गुप्ता, स्केटिंग सुवर्णपदक विजेता अद्वेत रेड्डी आदींचा सत्कार करण्यात आला. तर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मलविका बंसोड व बॉक्सिंग चॅम्पियन अल्फिया पठाण उपस्थित नसल्याने त्यांचे पुरस्कार कुटुंबीयांनी स्वीकारले. ज्येष्ठ विधी तज्ज्ञ व्ही. आर. मनोहर हे आजारी असल्याने त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात येईल.

अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. व्यासपीठावर उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, क्रीडा सभापती प्रमोद तभाने आदी उपस्थित होते. दयाशंकर तिवारी व अविनाश ठाकरे यांनी मनपाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली. प्रकाश भोयर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका