शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:34 IST

दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

ठळक मुद्देकारगिल युद्धाचे प्रमुख लेफ्नंट जनरल राजेंद्र निंभोकर यांना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्व.माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भाच्या विकासासाठी भरीव कार्य करणाºयांना किंवा विदर्भाचा लौकिक राज्य किंवा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविणाऱ्यांना ‘विदर्भ गौरव पुरस्कार ’ प्रदान केला जातो. श्रीमंत धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमात यंदाचा हा पुरस्कार कारगिल युद्धाचे प्रमुख व सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल(निवृत)राजेंद्र निंभोरकर यांना नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल शिरीष देव, मेजर जनरल राजेश कुंद्रा, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, कृ षी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, नगरसेवक निशांत गांधी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, देशासाठी लढणाऱ्या शूर पुत्राचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. युद्ध वा संघर्ष कुणालाही नको आहे. परंतु सामर्थ्यवानच शांतता प्रस्थापित करू शकतो. भारताची भूमिका शांततेची असली तरी संरक्षणाच्या बाबतीत आपण सामर्थ्यवान असलेच पाहिजे. यासाठी भारतीय सैन्य आंतरराष्ट्रीय दर्जाने सुसज्ज केले जात आहे. पाकिस्तानला भारताने तीनवेळा युद्धात पराभूत केले. परंतु दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. या कृ त्याचा धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेण्यात आला.विकास सिरपूरकर म्हणाले, सैनिकांचे आयुष्य वेगळेच असते. विपरित परिस्थितीचा सामना करीत देशाच्या सीमेचे संरक्षण करतात. शिवाजी सर्वांनाच हवा आहे. पण तो बाजूच्या घरात हवा, अशी लोकांची मानसिकता होती. हळुहळू यात बदल होत आहे. मराठी तरुणांची सैन्यात संख्या वाढली आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी कृषी विकास प्रतिष्ठानने २८ लाख खर्च केले ही कौतुकास्पद बाब आहे. राजेंद्र निभोंरकर यांची नागपूरला, विदर्भाला गरज आहे. येथील युवकांना तुम्ही स्फूर्ती द्या असे आवाहन करून सिरपूरकर यांनी भारत -चीन युद्धातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा दिला.निभोंरकर यांची सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका होती. यातून युवकांना प्रेरणा मिळेल. इतिहासात याची नोंद राहील असे प्रतिपादन रवींद्र ठाकरे यांनी केले. नागपूरच्या भूमीत राष्ट्रीयत्वाची भावना रुजलेली असल्याचे राजेश कुंद्रा यांनी सांगितले. राजेंद्र निंभोरकर यांच्या यशात त्यांची पत्नी शिला निंभोरकर यांचेही योगदान असल्याचे शिरीष देव म्हणाले. राजेंद्र निंभोरकर यांनी विदर्भ गौरव पुरस्कार स्वीकारल्याने या पुरस्काची प्रतिष्ठा वाढल्याचे गिरीश गांधी यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सोमेश्वर पुसदकर यांनी तर सूत्र संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार निशांत गांधी यांनी मानले.सर्जिकल स्ट्राईकमुळे जगाला भारताचे सामर्थ्य कळलेआपण सर्वांना भारतीय सेनेचा अभिमान वाटायला हवा. सैन्यावर आपल्याला गर्व असायला हवा, सैन्यावर शंका बाळगू नका, खोटे बोलणे हा सैन्याचा धर्म नाही. सैन्यात सर्वधर्मसमभाव आहे. सर्जिकल स्ट्राईकमुळे अमेरिका, रशिया यासारख्या बलाढ्य राष्ट्रासह जगाला भारताचे सामर्थ्य कळले. असे मनोगत लेफ्टनंद जनरल(निवृत्त)राजेंद्र निंभोरकर यांनी सत्काराच्या उत्तरात व्यक्त केले. दहशतवाद्याच्या हल्ल्यात आपले १९ जवान शहीद झाले होते. हा एक प्रकारे देशावरच आघात होता. यापूर्वीही मुंबईसह देशभरात दहशतवाद्यानी ठिकठिकाणी कारवाया केल्या. पाकिस्तनला धडा शिकवण्याची गरज होती. यातूनच सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. शत्रूच्या सीमेत ७ ते ८ किलोमीटर आत घुसून ३ ते ४ तासात एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही मोहीम फत्ते करण्यात आली. याची मोजक्याच लोकांना कल्पना होती. अशी माहिती निभोंरकर यांनी दिली.

 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकNitin Gadkariनितीन गडकरी