लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाशी दोन हात करण्याच्या सगळ््यांच्या लढाईत आपण एकत्र आहोत याचा उच्चार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या दिवे लावण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी आपल्या निवासस्थानाच्या बाल्कनीत येऊन दिवे पेटविले व कोरोनाविरुद्धचा आपला एल्गार सिद्ध केला. नागपुरातील अनेक भागात नागरिकांनी घरातील दिवे विझवून बाहेर येऊन मेणबत्ती वा टॉर्चचा उजेड केला. काही ठिकाणी फटाकेही उडविले गेले. काही वस्त्यांमध्ये वंदेमातरम गायले गेले तर भारत माता की जयच्या घोषणा दुमदुमल्या.
नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह पेटवले दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 21:52 IST