शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रला १० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:40 IST

चिंचमलातपुरेनगर ले-आऊट आराखड्यावर १ जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर सुधार प्रन्यासला दिली आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : ले-आऊटवर निर्णय घेण्याचा आदेश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : चिंचमलातपुरेनगर ले-आऊट आराखड्यावर १ जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर सुधार प्रन्यासला दिली आहे.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नासुप्रला १८ जुलै २००१ रोजी ले-आऊटचा आराखडा सादर करण्यात आला होता. परंतु, नासुप्रने त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेतला नाही. त्याचे स्पष्टीकरण देताना आराखडा तात्पुरता असल्याचे नासुप्रने न्यायालयाला सांगितले. त्याने न्यायालयाचे समाधान झाले नाही. परिणामी, न्यायालयाने संबंधित ले-आऊट आराखड्यावर १ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचा आदेश नासुप्रला दिला व आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल, अशी तंबी दिली.याविषयी चिंचमलातपुरेनगर नागरिक कृती समितीने सचिव प्रसाद पिंपळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात नासुप्र व इतर प्रतिवादींना नोटीस जारी करण्यापूर्वी याचिकाकर्त्यांना स्वत:ची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश १३ सप्टेंबर २०१७ रोजी दिला होता. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी ही रक्कम न्यायालयात जमा केली. त्यानंतर २० सप्टेंबर २०१७ रोजी न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. उज्ज्वल फसाटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास