शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 20:53 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित जनहित याचिकेची गंभीर दखल घेऊन नागपूर सुधार प्रन्यास कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजना महापालिका व नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असा अंतरिम आदेश दिला. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीची प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा स्थगनादेश : जनहित याचिकेची गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित जनहित याचिकेची गंभीर दखल घेऊन नागपूर सुधार प्रन्यास कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजना महापालिका व नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असा अंतरिम आदेश दिला. त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीची प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीच्या निर्णयाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरील अंतरिम आदेश दिला. तसेच, नगर विकास विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त, नासुप्र सभापती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक यांना नोटीस बजावून यावर ४ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.२७ डिसेंबर २०१६ रोजी मंत्रिमंडळ परिषदेच्या बैठकीमध्ये ३१ डिसेंबर २०१७ पासून नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करून प्रन्यासचे सर्व अधिकार व जबाबदाऱ्या महापालिका व नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायद्यातील कलम १२१ मधील तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. या कलमानुसार, नासुप्र कायद्यांतर्गत मंजूर योजना पूर्णपणे अमलात आणल्या गेल्यानंतरच राज्य सरकार अधिसूचना जारी करून नासुप्र बरखास्त करू शकते. मंत्रिमंडळ परिषदेचा वादग्रस्त निर्णय या तरतुदीचे उल्लंघन करणारा आहे. नासुप्र कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना आजही अर्धवट आहेत. त्यामुळे बरखास्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असे याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. या बाबी लक्षात घेता वादग्रस्त निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासHigh Courtउच्च न्यायालय