शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्र १४ ऑगस्टपर्यंत बरखास्त : शहरात राहणार एकच विकास संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:49 IST

शहरात दोन विकास संस्था कार्यरत असल्यामुळे अनेकदा विकास कामांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळेच शहरात एकच विकास संस्था असावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून केली जात आहे. त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलल्या बैठकीत नागपूर सुधार प्रन्यासला बरखास्त करून त्याला महानगरपालिकेत विलीन करण्याचा प्रस्तावावर येत्या १४ ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात दोन विकास संस्था कार्यरत असल्यामुळे अनेकदा विकास कामांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळेच शहरात एकच विकास संस्था असावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून केली जात आहे. त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलल्या बैठकीत नागपूर सुधार प्रन्यासला बरखास्त करून त्याला महानगरपालिकेत विलीन करण्याचा प्रस्तावावर येत्या १४ ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली.शहरात नासुप्र बरखास्त करून ते मनपाल विलीन करण्याची मागणी खूप जुनी आहे. सत्ताधारी भाजपही ही मागणी करीत आले आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतर नासुप्रची संपत्ती व प्रकल्प मनपाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडी)चेही गठन करण्यात आले. परंतु नासुप्र अजूनपर्यंत बरखास्त झालेली नाही. गुरुवारी यासंदर्भात मुंबईत उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सचिव मनिषा म्हैसकर, महापौर नंदा जिचकार, आ. डॉ.मिलिंद माने, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, मनपा आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.नासुप्र बरखास्त करुन मनपात विलीन करण्याची जुनी मागणी होती. त्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने नासुप्र मनपात विलीन करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.नासुप्र-मनपात होणार करारया बैठकीत ठरल्यानुसार नागपूर सुधार प्रन्यासच्या सर्व मालमत्तासह सर्व मनपाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. नासुप्र सभापती आणि मनपा आयुक्त यांच्यात करार होईल. तसेच न्यायालयीन प्रकरणेही मनपाला हस्तांतरीत करण्यात येतील. कर्मचारी मनपात किंवा एनएमआरडीएकडे वर्गीकृत करण्यात येतील. नासुप्रची प्रशासकीय इमारत वगळून नासुप्रच्या शहरातील सर्व मालमत्ता मनपाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास