शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ९० टक्के महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:44 IST

रस्त्याच्या कडेला विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे नागपूरच्या फूटपाथवर दिसून येतात. मात्र या कुटुंबातील ९० टक्के महिला आजही ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूरच असून अंधश्रद्धेपोटी त्या यांचा वापर टाळत आहेत.

ठळक मुद्देपांढऱ्या कापडाबाबत अंधश्रद्धेचा पगडा

मेघा तिवारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्याच्या कडेला विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे नागपूरच्या फूटपाथवर दिसून येतात. मात्र या कुटुंबातील महिलांच्या आरोग्याकडे समाज व प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे. येथील ९० टक्के महिला आजही ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूरच असून अंधश्रद्धेपोटी त्या यांचा वापर टाळत आहेत. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी फारसा पुढाकार नसल्याने नवीन पिढीदेखील याच मार्गाने जात असल्याचे वास्तव आहे.‘लोकमत’ने शहरातील महाराज बाग मार्ग, सीताबर्डी, शंकरनगर, रेल्वेस्थानक यासारख्या विविध भागात ‘फूटपाथ’वर राहणाऱ्या महिलांकडून मासिक पाळीदरम्यानच्या आव्हानांबाबत जाणून घेतले. अवघ्या १९ व्या वर्षी २ मुलांची आई झालेल्या सीमाला (नाव बदललेले) यासंदर्भात विचारणा केली असता तिने धक्कादायकच माहिती दिली. ‘मी माझ्या अवघ्या आयुष्यात मासिक पाळीदरम्यान कधीही ‘सॅनिटरी नॅपकिन’चा उपयोग केलेला नाही. या काळात कपडा वापरण्यावरच आमचा भर असतो. ‘पॅड’ वापरणे हे आमच्या संस्कृतीचा भाग नाही. जी देवता कधीही पांढरे वस्त्र परिधान करत नाही, तिच्यावर आमची श्रद्धा आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे ‘सॅनिटरी नॅपकिन’ वापरणे म्हणजे आमच्या श्रद्धेवरच आघात करण्यासारखे आहे’, असे तिने सांगितले.२०१५-१६ च्या ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार ४८.५ टक्के (ग्रामीण भाग) व ७७.५ टक्के (शहरी भाग) भारतीय महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चा उपयोग करतात. मात्र रस्त्यांवर राहणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे.

चक्क नागनदीत कपड्याची विल्हेवाटमासिक पाळीत वापरलेल्या कपड्याची विल्हेवाट लावण्याची या महिलांची तऱ्हा तर अतिशय अयोग्य आहे. ज्या महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ वापरतात त्या त्यांची विल्हेवाट नागनदीमध्ये करतात. तर कपडेदेखील तेथेच फेकण्यात येतात, अशी माहिती एका महिलेने दिली.

अस्वच्छ कपड्याचा उपयोग धोकादायकबहुतांश महिलांकडून मासिक पाळीदरम्यान अस्वच्छ कपड्याचा वापर करण्यात येतो. मात्र हा कपडाच आरोग्यासाठी सर्वात धोकादायक ठरु शकतो. मात्र याचीदेखील जाणीव या महिलांना नाही. आपली अंतर्वस्त्रे कपड्याची बनलेली असतात. जर ती धोकादायक नाही, तर मग त्यांचा मासिक पाळीदरम्यान उपयोग अयोग्य कसा, असा प्रश्न एका महिलेने उपस्थित केला. मात्र या कपड्यांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. यातून गंभीर आजार होऊ शकतात. जर योग्य स्वच्छता ठेवली नाही, तर कर्करोगदेखील होण्याची शक्यता असते, अशी माहिती वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्य