शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली बस’ मध्ये दिवसाला नऊ हजार फुकटे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:45 IST

महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ ते ९ हजार प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. यामुळे परिवहन विभागाला वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

ठळक मुद्देमनपाचे कसे वाढणार उत्पन्न : वर्षभरात ४८ कोटींचा तोटा

लोकमत न्युज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ ते ९ हजार प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. यामुळे परिवहन विभागाला वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याला वेळीच आळा न बसल्यास परिवहन विभागाच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे.वंश निमय यांच्याकडे शहर बसची जबाबदारी असताना दररोज १ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत होते. आता ही जबाबदारी तीन आॅपरेटरकडे दिलेली आहे. मात्र प्रवाशांची संख्या १.७७ लाखांवर गेली आहे. यात फारशी वाढ झालेली नाही. प्रवाशांची संख्या चार लाखांवर गेली तरच परिवहन सेवा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविणे शक्य होईल. अशी माहिती परिवहन समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नितीश ग्वालबंशी व नितीन साठवणे उपस्थित होते.नागपूर शहरात ३५३ बसेस धावतात. डिसेंबर २०१६ पासून ‘ट्रायलरन’ व त्यानंतर १ मार्च २०१७ पासून पूर्णपणे शहर बस सेवा सुरू झाली. जानेवारी २०१८ रेडबसच्या माध्यमातून ५३ कोटी ९७ लाख ४ हजार २८४ रुपयाचे उत्पन्न झाले . तर या कालावधीत आॅपरेटरला १०१ कोटी ९७ लाख ८६ हजार ४६५ रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे. म्हणजेच परिवहन विभागाला ४८.८२ कोटींचा तोटा झाला आहे. सर्व बसचे व्यवस्थापन व नियंत्रणाची जबाबदारी डिम्ट्स या आॅपरेटरकडे सोपविण्यात आली आहे़ मात्र या कंपनीचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक