शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळाच्या झाडावर वीज काेसळल्याने नऊ माकडांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 20:52 IST

Nagpur News सावनेर तालुक्यातील वलनी (ता. सावनेर) शिवारात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी वीज काेसळल्याची घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यात नऊ माकडांचा मृत्यू झाला

नागपूर : सावनेर तालुक्यातील वलनी (ता. सावनेर) शिवारात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी वीज काेसळल्याची घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यात नऊ माकडांचा मृत्यू झाला तर एका मंदिरातील विद्युत साहित्य जळाले.

खापरखेडा परिसरात गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, वलनी वस्तीजवळच्या कन्हान नदीकाठावरील माकडांचा कळप असलेल्या पिंपळाच्या झाडावर वीज काेसळली. त्यात झाडावरील नऊ माकडांचा हाेरपळून मृत्यू झाला. गावातील नंदकिशाेर आंबिलडुके हा घटनास्थळी पाेहाेचला असता, त्याला झाडाखाली मृत माकडे दिसून आली.

याबाबत त्याने वलनी ग्रामपंचायत, वनविभागाला सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव प्रेमी दादू गणवीर, जि. प. सदस्य प्रकाश खापरे घटनास्थळी पाेहाेचले. वनविभागाचे आश्विन काकडे, रेखा चोंदे, अनिल राठोड, पाेलीस उपनिरीक्षक नामदेव धांडे, शिपाई सदानंद नारनवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान वन अधिकारी व पाेलिसांनी जेसीबी बाेलावून मृत माकडांना जमिनीत पुरण्यात आले. दुसऱ्या घटनेत वलनी वस्तीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसावर वीज काेसळल्याने तेथील विद्युत साहित्य जळाले. या घटनेबाबत सावनेरचे तहसीलदार व तलाठी यांना माहिती देण्यात आली. परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून आले.

टॅग्स :Monkeyमाकड