शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

कारमध्ये सापडला नऊ लाखांचा गांजा

By admin | Updated: October 10, 2016 02:31 IST

गुन्हे शाखेतील एनडीपीए सेलने आंतरराज्यीय टोळीचा ९ लाख रुपये किमतीचा ८९ किलोचा गांजा एका

नागपूर : गुन्हे शाखेतील एनडीपीए सेलने आंतरराज्यीय टोळीचा ९ लाख रुपये किमतीचा ८९ किलोचा गांजा एका कारमध्ये पकडला. १ सप्टेंबर रोजी पकडण्यात आलेल्या ७६ लाख ५१ हजार रुपयाच्या गांजाच्या तपासादरम्यान हा गांजा हाती लागला. ही कारवाई रविवारी पहाटे हिंगणा येथे करण्यात आली. पोलिसांनी कार चालक व्यंकटकुमार रमन ऊर्फ राजा नारायण सिंह (२७) सुरजगड, छत्तीसगड आणि सुशीलकुमार बद्रीप्रसाद चंद्रा (२४) रा. भिलाई, छत्तीसगड या दोघांना अटक केली. या टोळीचा मुख्य सूत्रधार ऋषी मित्तल ऊर्फ केसर अग्रवाल रा. रायपूर प्रीतमकुमार खुटे ऊर्फ पी. बॉस, आणि ऋषीचा ड्रायव्हरचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. वाहतूक पोलीस शिपाई प्रशांत मिसाड यांनी १ सप्टेंबर रोजी कळमनातील कापसी येथे नाकाबंदी दरम्यान एका अ‍ॅम्बुलन्समधून ७६५ किलो गांजा पकडला होता. ती अ‍ॅम्बुलन्स मध्य प्रदेशातील होती. तपासादरम्यान ती अ‍ॅम्बुलन्स ऋषी आणि प्रीतमकुमारने गांजा तस्करीसाठी खरेदी केल्याची माहिती समोर आली. ही टोळी ओडिशातून गांजा गुजरातमध्ये पोहोचवते. ३ आॅक्टोबरला अ‍ॅम्बुलन्स चालक संतोष बंटुराम खुटे (३१) रा. सोनी मोहल्ला, कोरबा छत्तीसगड याला पोलिसांनी अटक केली. तेव्हा नागपुरातून गांजाची मोठी तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील सीमावर्ती मार्गावर बंदोबस्त ठेवला होता. रविवारी पहाटे ४ वाजता एक लक्झरी कार हिंगणा येथे पोलिसांचे बॅरीकेट्स तोडून फरार झाली होती. १०० ते १२० किलोमीटरने ती कार धावत होती. पोलीस कारचा पाठलागही करू शकले नाही. त्यानंतर सीजी/०४/एलबी/६६४४ क्रमांकाची कार तेथून जात होती. पोलिसांनी कारला थांबले. कारची तपासणी केल्यावर त्यात १४ पार्सल सापडले. ते उघडून पाहिले असता त्यात गांजा होता. पोलिसांनी चालक व्यंकटकुमार ऊर्फ राजा आणि त्याचा साथीदार सुशीलकुमार यांना अटक केली. त्यांनी ऋषी मित्तल आणि प्रीतमकुमार खुटे याच्यासाठी काम करीत असल्याचे कबूल केले. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहआयुक्त संतोष रस्तोगी, अपर आयुक्त रंजन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखली निरीक्षक दीपक खोब्रागडे, पीएसआय नरेंद्र गिरी, अशोक हिरुडकर, हवालदार संतोष ठाकूर, दत्ता बागुल, विठोबा काळे, सतीश पाटील, नितीन रांगणे, किशोर महंत, तुलसी शुक्ला, कृष्णा इवनाते संदीप ढोबळे, नरेश शिंगणे यांनी केली. (प्रतिनिधी) फरार कारमधून लाखोचा गांजा पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून जी कार फरार झाली त्यात लाखो रुपयांचा गांजा होता. पोलिसांनी कार पकडण्यासाठी शहरात लगेच नकाबंदी सुद्धा केली होती. परंतु यश आले नाही. कार सहजपणे शहराच्या सीमेतून पार झाली. टोल नाक्याच्या सीसीटीव्हीतून ही बाब स्पष्ट झाली. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तानंतरही आरोपी फरार होणे गंभीर आहे. आरोपी ‘कुरिअर मॅन’ पोलिसांच्या हाती लागलेले आरोपी हे ‘कुरिअर मॅन’चे काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना धुळे येथे वाहन सोपविण्यात आले होते. त्यांना रायपूरमध्ये दुसऱ्याला वाहन सोपवायचे होते. तिथे पोहोचल्यावर मोबाईलवर संपर्क करण्यास सांगण्यात आले होते. ही पूर्ण टोळी मोबाईलवरच संचालित केली जाते. संतोषजवळ पोलिसांना ११ सीम कार्ड सापडले. आरोपींशी संबंधित लोकांची नावे कोडवर्डमध्ये लिहिलेली होती.