शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात अवतारेसह नऊ आरोपी निर्दोष

By admin | Updated: November 10, 2014 00:58 IST

भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आणि उमरेड मार्गावरील बहादुरा ग्रामपंचायतीचा सदस्य आकाश पंचभाई याच्या निर्घृण खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या

बहादुरा ग्रा. पं. सदस्याचे खूनप्रकरण: मृताचे भाऊही झाले होते ‘होस्टाईल’नागपूर : भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आणि उमरेड मार्गावरील बहादुरा ग्रामपंचायतीचा सदस्य आकाश पंचभाई याच्या निर्घृण खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या न्यायालयाने कुख्यात गुन्हेगार संजय अवतारे याच्यासह सर्व नऊ आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली. उल्लेखनीय म्हणजे या खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान मृताचे दोन्ही भाऊ आपली साक्ष देताना फितूर झाले होते. खुनाची ही घटना २७ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोननगर येथे घडली होती. अन्य आरोपींमध्ये जगपालसिंग यादव, पप्पू शाहू, अरविंद ऊर्फ भुऱ्या घोटेकर, महेंद्र मोहाडीकर, राजू ऊर्फ राजा पानतावणे, दामू राऊत, संजय शाहू आणि बादल वाघमारे यांचा समावेश आहे. सरकारी पक्षानुसार खुनाच्या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी २४ सप्टेंबर रोजी उमरेड मार्गावरील ताराम लॉन या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आकाश , त्याचे दोन भाऊ तसेच कुख्यात संजय अवतारे आणि साथीदार सहभागी झाले होते. या समारंभात पंचभाईसोबत संजय अवतारे याचे भांडण झाले होते. तेव्हा अवतारे हा तलवार घेऊन आकाशच्या मागे धावला होता. सहा महिन्यापूर्वीही आकाशचे पाण्याच्या टँकरवरून जगपालसिंग याच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे या सर्वांनी आकाशचा काटा काढण्याचे ठरवले होते. आकाश पंचभाई हा सुद्धा एका खुनाचा आरोपी होता. राजकारणात सक्रिय झाल्याने त्याने गुन्हेगारी सोडली होती. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यापासून त्याचे वर्चस्व वाढले होते. परंतु ते संजय अवतारे याला खुपत होते. घटनेच्या दिवशी आकाशचा भाऊ प्रदीप धनराज पंचभाई हा घरी गणपतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम असल्याने भाजीपाला विकत घेण्यासाठी कॉटन मार्केट येथे जाण्यासाठी निघाला होता. त्याला टेलिफोननगर येथील बाळू पान पॅलेससमोर संजय अवतारे आणि साथीदार हातात तलवारी व इतर साहित्य घेऊन दिसले. ते लोकांच्या दिशेने तलवारी झळकवत होते. घटनास्थळावर एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसताच प्रदीपने जवळ जाऊन पाहिले असता तो त्याचा भाऊ आकाश असल्याचे त्याला समजले होते. प्रदीपच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी खून व दंग्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विजय आकोत यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले होते. मृत आकाशचे दोन्ही भाऊ, अन्य साक्षीदार आणि एकमात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज ठाकरे हा फितूर झाला होता. त्यामुळे सबळ पुराव्याच्या अभावी न्यायालयाने सर्व नऊ आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. अविनाश गुप्ता, अ‍ॅड. अमित बंड, तर सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)