शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील निमगडे हत्याकांड : सीबीआयकडून पाच लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 20:46 IST

तीन वर्षांपूर्वी भल्या सकाळी वर्दळीच्या मार्गावर गोळ्या घालून ठार मारण्यात आलेल्या एकनाथ धर्माजी निमगडे यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता सांगणाऱ्याला सीबीआयने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती सांगणाऱ्याचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली जाईल, असेही सीबीआय, मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेने म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षांपूर्वी भल्या सकाळी वर्दळीच्या मार्गावर गोळ्या घालून ठार मारण्यात आलेल्या एकनाथ धर्माजी निमगडे यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता सांगणाऱ्याला सीबीआयने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती सांगणाऱ्याचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली जाईल, असेही सीबीआय, मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेने म्हटले आहे.सेंट्रल एव्हेन्यूत राहणाऱ्या आर्किटेक्ट निमगडे यांची ६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी लाल ईमली गल्लीत पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणाने शहरात प्रचंड खळबळ उडवली होती. कोट्यवधींच्या जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा अंदाज बांधून स्थानिक पोलिसांनी एका बिल्डरसह आणि प्रॉपर्टी डिलर तसेच दलालांसह अनेकांची चौकशी केली होती. मात्र प्रदीर्घ तपास करूनही पोलिसांना या हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळाले नाही. दरम्यान, मृत निमगडे यांच्या नातेवाईकांसह अनेकांकडून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी जोरदार मागणी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, वर्षभरात सीबीआयच्या पथकाने नागपुरात अनेकदा भेटी दिल्या. तपास अधिकारी तसेच या प्रकरणाशी संबंधितांना विचारपूस केली. अनेकांची चौकशीही केली. मात्र, सीबीआयला निमगडेंच्या मारेकऱ्यांपर्यंत घेऊन जाणारा धागादोरा गवसला नाही. त्यामुळे सीबीआयच्या मुंबई कार्यालयातून सोमवारी एक पत्रक जारी करण्यात आले. त्यात निमगडे यांच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात मदत करणारी माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे नमूद आहे. कार्यालय, केंद्रीय अण्वेषण ब्युरो (सीबीआय), विशेष गुन्हे शाखा, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई (संपर्क क्रमांक : ०२२ २७५७६८२०/ २७५७६८०४) किंवा तपास अधिकाऱ्याच्या मोबाईलवर (९५९४१४०५५५) संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन यात करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव आणि ओळख गुप्त ठेवण्यात येईल, अशी हमीही सीबीआयने दिली आहे.

टॅग्स :MurderखूनCBIगुन्हा अन्वेषण विभाग