शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

नीलेशच निघाला ‘मास्टर मार्इंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:38 IST

इंजिनियर तरुणी अंकिता खूनप्रकरणात आतापर्यंत झालेल्या पोलिसांच्या तपासात आरोपींना पकडून देण्यास मदत करणारा बिल्डर नीलेश खोब्रागडे हाच या खुनाचा ‘मास्टर मार्इंड’ निघाला.

ठळक मुद्देअंकिता कनोजिया खूनप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंजिनियर तरुणी अंकिता खूनप्रकरणात आतापर्यंत झालेल्या पोलिसांच्या तपासात आरोपींना पकडून देण्यास मदत करणारा बिल्डर नीलेश खोब्रागडे हाच या खुनाचा ‘मास्टर मार्इंड’ निघाला. आतापर्यंत स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करणाºया नीलेशबाबत लोकमतने संशय व्यक्त केला होता.सूत्रानुसार ठरवलेल्या योजनेप्रमाणे ४ सप्टेंबर रोजी नीलेश आणि निखीलेश हे अंकिताला अक्षयच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. अंकिताने आरडाओरड करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. भीतीने नीलेश तेथून पळाला. यानंतर निखीलेश व अक्षयने अंकिताचा गळा आवळून खून केला. मृतदेह कुठे लपवायचा याची त्यांना चिंता सतावू लागली. त्यांनी नीलेशला खुनाची माहिती दिली. त्याच्या मदतीनेच अंकिताचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून राज्याच्या सीमेबाहेर फेकण्याचा निर्णय घेतला. यासाठी एक नवीन सुटकेस खरेदी केली. यात मृतदेह ठेवून नीलेशसोबत कर्नाटकच्या सीमेकडे रवाना झाले. अंकिताचा खून झाल्यानंतर नीलेशने निखीलेश व अक्षयला ‘प्लॅन’ समजावून सांगितला. त्याने पोलीस प्रशासनात आपली ओळख असल्याचे सांगून या खुनात माझा काही सहभाग नाही, असे पोलिसांना सांगण्यास निखीलेश व अक्षयला सांगितले. ‘मी बाहेर राहिल्यास तुम्हा दोघांना बाहेर आणू शकतो, असा विश्वास त्यांना नीलेशने दाखवला. त्यांना जामीन मिळवून देण्यास व निर्दोष सोडवण्यासाठी सुद्धा तो मदत करेल, असेही सांगितले. निखीलेश हा नीलेशकडेच काम करीत होता. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला. अक्षय हार्डवेयर आणि निखीलेश आयटी इंजिनियर आहे. नीलेश बिल्डर आहे. ठाणे पोलिसांनी तिघांनाही १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. पोलिसांनी रविवारी आरोपीने सांगितल्यानुसार पूर्ण घटनाक्रमाची रिहर्सल केली. अंबरनाथ येथील ज्या दुकानातून सुटकेस खरेदी केली त्या दुकानदाराचे बयाण सुद्धा नोंदविण्यात आले.महाग पडला विश्वासअंकिता ही हुशार तरुणी होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील अंकिताने जीवनात यशस्वी होण्यासाठी घराबाहेर पाऊल ठेवले. तिची निखीलेश सोबत केवळ सहा महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. तिला निखीलेशबाबत फार काही माहितीही नव्हती. मैत्री असल्याने त्याच्यासोबत फिरायला गेली. परंतु त्याच्या मनात काय आहे, हे ती ओळखू शकली नाही.