स्वत:वर विश्वास ठेवा : ऊर्जेचा उपयोग करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘नीट’चे तीन तास तुमचे जग बदलू शकतात. त्यासाठी शांतता आणि ऊर्जेचा उपयोग बरोबर करण्याची गरज आहे. मेडिकल प्रयोजनमने ‘नीट’च्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेत आपली हुशारी दाखविणार आहे. त्यांच्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांनी त्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रश्न चुकला तरीही शांत राहा. तीन तास चेस बोर्डासारखे आहेत. ‘नीट’ परीक्षा देताना तीन गोष्टींवर लक्ष ठेवा. रूल आॅफ फोकस अर्थात कुठलाही प्रश्न सोडवा की तो तुमचा शेवटचा प्रश्न असेल. किती प्रश्न चुकले अथवा बरोबर आहे, या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. रूल आॅफ ट्रस्ट अर्थात स्वत:मध्ये असीम ऊर्जेचा संचार होऊ द्या आणि परीक्षेत अतूट विश्वास कायम ठेवा. रूल आॅफ थॉट्स म्हणजे तुम्ही स्वत:चे मार्गदर्शक आहात हे समजून चांगले विचार करा. पूर्ण वर्षाची मेहनत कशी होती, याने काहीही फरक पडत नाही. जर तुम्हाला कुठला प्रश्न येत नसेल तर कमजोर पडू नका. प्रश्न वाचल्यानंतर लगेच चार पर्याय वाचू नका. आधी तुम्ही जे उत्तर काढले ते समोर ठेवा. म्हणजे पर्याय वाचून तुम्ही चुकीच्या दृष्टीने जाणार नाही. प्रश्न सोडविताना गोळे (सर्कल) भरले पाहिजेच, कारण नंतर गोळे भरणे सुटू शकते किंवा घाईत चुकीचे उत्तर भरले जाऊ शकते. ओएमआर भरतेवेळी प्रश्नांची संख्या आणि सर्कलची संख्या आवश्यक बघावी. मनावर नियंत्रण ठेवा. कुठलाही अंदाज लावून सर्कल भरू नका. निगेटिव्ह मार्किंगने निकाल खराब होऊ शकतो. जिंकण्यासाठी १८० पैकी १२० प्रश्न बरोबर सोडवायचे आहे. म्हणजे ६० प्रश्न सोडू शकता. कुठलाही प्रश्न पुन्हा पुन्हा वाचण्यापासून दूर राहा. एकदाच एकाग्रतेने प्रश्न वाचून सोडविण्याचा प्रयत्न करा. परीक्षेच्या वेळेत थकवा आल्यास डोळे मिटून तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि चेहऱ्यावरून हात फिरवा. आजूबाजूला बघू नका. जवळ कोण आहे किंवा भिंतीवर कुठला रंग आहे, असे केल्याने लक्ष भटकू शकते. परीक्षेपूर्वी कमी बोला. ऊर्जा सौरक्षणाचा सिद्धांत लक्षात ठेवा. ‘नीट’ परीक्षेचे तीन तास पुन्हा येणार नाहीत, म्हणून स्वत:वर विश्वास ठेवून परीक्षेला आनंदाने सामोरे जावे. (वा.प्र.)
‘नीट’चे तीन तास तुमचे जग बदलू शकतात
By admin | Updated: May 7, 2017 02:20 IST