शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या माहितीबाबत वर्तमानपत्रेच विश्वासार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:58 IST

‘व्हॉट्सअ‍ॅप’सह ‘सोशल मीडिया’वर क्षणाक्षणाला विविध ‘पोस्ट’ येत असताना नागपूरकरांना मात्र वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांमध्ये येणारी ‘कोरोना’ची माहिती हीच सर्वाधिक विश्वासार्ह वाटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे ‘सोशल मीडिया’...भरवशाचाच नाही ‘फेक न्यूज’संदर्भात नागरिकांना विचारणा करण्यात आली होती. बहुतांश नागरिकांनी ‘सोशल मीडिया’वरील ५० ते ८० टक्के माहिती खोटी असल्याचे मत व्यक्त केले.‘फेक न्यूज’बाबत नागरिक सजग सरकारी पातळीवरून खुलासा झाल्यावर ‘फेक न्यूज’ ओळखल्याचे ३६.५ टक्के नागरिकांनी सांगितले. तर ५१.५ टक्के लोकांनी स्वत:च ‘फॅक्ट चेकिंग’ संकेतस्थळाच्या माध्यमातून बातमीतील सत्यता शोधून काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे ‘कोरोना’शी संपूर्ण जग लढत असताना दुसरीकडे योग्य माहिती व ‘फेक न्यूज’ असा सामना सुरू आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’सह ‘सोशल मीडिया’वर क्षणाक्षणाला विविध ‘पोस्ट’ येत असताना नागपूरकरांना मात्र वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांमध्ये येणारी ‘कोरोना’ची माहिती हीच सर्वाधिक विश्वासार्ह वाटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विविध माहिती, सल्ले, आवाहन इत्यादी विविध माध्यमातून समोर येत आहे. यात प्रामुख्याने वृत्तपत्रे (डिजिटल कॉपीसह), वृत्तवाहिन्या, रेडिओ, ‘सोशल मीडिया’ व ‘डिजिटल मीडिया’ यांचा समावेश आहे. परंतु नेमकी कुठली माहिती खरी याबाबत काही वेळा संभ्रम निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेऊन जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईज हक यांच्या नेतृत्वात ६४ विद्यार्थ्यांनी २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ‘आॅनलाईन’ सर्वेक्षण केले. या कालावधीत सर्वाधिक विश्वासार्ह माहिती मुद्रित माध्यमांनीच दिली व वाचकांनीदेखील वर्तमान पत्रांवरच सर्वात जास्त विश्वास ठेवला, असे या सर्वेक्षणातून समोर आले. सर्वेक्षणात समाजमाध्यमांची विश्वासार्हता, उपयोगिता व जबाबदारीपूर्वक मांडणी या मापदंडांवरदेखील वर्तमानपत्रेच समोर राहिली. सर्वेक्षणात १२०५ नागरिकांनी आपले मत नोंदविले. यात सर्वच स्तरातील नागरिक सहभागी होते.‘ई-पेपर’वर भर‘लॉकडाऊन’च्या या कालावधीत वर्तमानपत्रांचे वितरण काही काळासाठी बंद होते. परंतु वृत्तपत्रे निघत होती व वाचकांपर्यंत ‘पीडीएफ कॉपी’ तसेच ‘ई-पेपर’ पोहचविल्या जात होते. २२.८ टक्के नागरिकांनी ई-पेपर’च्या माध्यमातून वर्तमानपत्रे वाचली. तर २७ टक्के नागरिकांनी मित्र, ओळखीचे लोक किंवा पत्रकारांकडून ‘ई-पेपर’चे ‘लिंक’ मिळाले व त्यानंतर वर्तमानपत्रे वाचल्याचे सांगितले. म्हणजेच सुमारे ५० टक्के नागरिकांनी या कालावधीतदेखील वर्तमानपत्रांचाच उपयोग केला.‘हार्डकॉपी’ नसताना अशी घेतली माहितीई-पेपर २२.८ टक्केवर्तमानपत्रांच्या पीडीएफ, लिंक २७ टक्केवृत्तवाहिन्या ३६.१ टक्के‘सोशल मीडिया’ १०.४ टक्केइतर ३.७ टक्के

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस