शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

अपघाताच्या वृत्ताने वाढवली होती धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेदनेचा राजा अर्थात ‘ट्रॅजेडी किंग’ अशी रसिक पावती मिळविणारे दिलीप कुमार ...

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वेदनेचा राजा अर्थात ‘ट्रॅजेडी किंग’ अशी रसिक पावती मिळविणारे दिलीप कुमार उपाख्य युसुफ खान यांचे चाहते सर्वत्र होते आणि आहेत. खासगी विवाह सोहळ्यात असो, श्री साई बाबा मंदिराच्या जमिनीच्या खरेदीसाठी दानदात्यांचा सोहळा असो वा प्रसिद्ध शायर डॉ. मन्शा यांच्या सत्कारासाठी असो, तीन-चारदा ते नागपूरला येऊन गेले. आले आणि प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या अभिनयाव्यतिरिक्त वक्तृत्व अदायगीने कित्येक स्मृती नागपूरकरांच्या हृदयात कोरून ठेवल्या. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे वाकी दरबारच्या भूमिपूजनाचा होय. दिलीप कुमार वेळेवर पोहोचले नाहीत आणि दरम्यान अपघाताचे वृत्त हाती आले. नेमके काय घडले, कसे घडले या चिंतेने उपस्थित श्रोत्यांमध्ये धाकधूक वाढायला लागली होती.

तत्कालीन खासदार एन.के.पी. साळवे यांचे दिलीप कुमार यांच्याशी घनिष्ट संबंध होते. त्यांच्याच प्रयत्नातून दिलीप कुमार प्रसिद्ध शायर डॉ. मन्शा यांच्या सत्कारासाठी नागपूरला आले होते. हा कार्यक्रम २२ फेब्रुवारी १९९१ रोजी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात रात्री ९ वाजता होणार होता. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरपासून जवळच असलेल्या वाकी येथे हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या दरबाराचा भूमिपूजन सोहळा दिलीप कुमार यांच्याच हस्ते करण्याचे नियोजन होते. त्या अनुषंगाने सकाळी ९ वाजता भूमिपूजन पार पडणार होते. कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली. लोकही मोठ्या संख्येने पोहोचले. त्या वेळी आजच्यासारखे मोबाइलही नव्हते. त्यामुळे करंट हॅपनिंग कळत नव्हती. दरम्यान, सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूरचे तत्कालीन महापौर वल्लभदास डागा, माजी महापौर पांडुरंग हिवरकर घटनास्थळी पोहोचले. मात्र, दिलीप कुमार येईनात. त्यामुळे नागरिक प्रचंड वैतागले होते आणि निराशाही व्यक्त करीत होते. अशात एक नकोसे वृत्त नागरिकांच्या कानी पडले... कोराडी येथे भयंकर अपघात झाला. मात्र, कोणाचा..? कसा..? हे काहीच कळेना. अनेकांच्या मनात गैरसमज, चिंता निर्माण होऊ लागल्या. मात्र, अर्ध्या तासातच तो अपघात दुसऱ्या कुणाचा तरी असल्याचे वृत्त धडकले. मात्र, अपघातामुळे स्थानिकांनी रस्ता अडवून धरल्याने पाहुणे अर्थात दिलीप कुमार अडकले असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यामुळे, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास त्यांना किती उशीर लागेल, हे अवघड असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता दिलीप कुमार पत्नी सायरा बानो व खा. एन.के.पी. साळवे यांच्यासोबत कार्यक्रमस्थळी दाखल झाले. कार्यक्रम आटोपल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला.

-----------

माणसामाणसांत फूट पाडणाऱ्यांपासून केले होते सावध

माणसाच्या मनात द्वेषाची भावना पसरवली जात आहे. मेंदू विभागला जात आहे. हे काम फुटीरवादी प्रवृत्ती करीत आहेत. केवळ फूट पाडणे हेच त्यांचे काम असून, अशांपासून सावध राहण्याचे आवाहन दिलीप कुमार यांनी भूमिपूजन प्रसंगी केले होते.

--------------

मोठा ताजबागचे दर्शन

दिलीप कुमार जेव्हा जेव्हा नागपूरला येत, तेव्हा तेव्हा ते मोठा ताजबाग येथे जाऊन ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेत व समाधीवर माथा टेकून चादर चढवत असत.

......