शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 11:09 IST

आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.

ठळक मुद्देवनराईचा मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्तमान शिक्षण हे थराथराने रचलेले, स्तरीकृत असल्यासारखे आहे. १५ वर्षापर्यंत प्राथमिक-माध्यमिक शिक्षण, नंतर चार वर्ष पदवी, पुढे मास्टर्स आणि पीएच.डी. विद्यापीठाच्या, महाविद्यालयांच्या शिक्षणात संशोधनाला वाव न मिळणे ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करणारे शिक्षणाचे धोरणच नसल्यासारखे वाटते. यापेक्षा एखादवेळी विद्यार्थ्याने घेतलेला विषय नकोसा वाटल्यास तो सोडून आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे माजी चेअरमन आणि केंद्र शासनाच्या नवे शिक्षण धोरणा करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांना वनराई फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवारी नीरी येथील सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र मुळक, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, माजी संचालक डॉ. एस. आर. वटे, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, फाऊंडेशनचे सचिव किशोर धारिया प्रामुुख्याने उपस्थित होते. त्यांनी यावेळी नीरी आणि वनराईच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. सतीश धवन आणि डॉ. यु.आर. राव यांच्या मार्गदर्शनातून दिशा मिळाल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कार्याविषयी माहिती दिली. संचालन रेखा घिया-दंडिगे यांनी केले.

राजकीय नेतृत्वामुळे शिक्षण व विज्ञान अपयशी : पृथ्वीराज चव्हाणयुपीए शासनाच्या काळात विज्ञान व संशोधनासाठी एक टक्का बजेट ठेवले होते. आपले पंतप्रधान दरवर्षी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये जाऊन हे बजेट २ टक्के करण्याचे वक्तव्य करतात, त्यांना टाळ्याही मिळतात पण दुर्दैवाची बाब म्हणजे हेच बजेट एकवरून ०.६ टक्केवर पोहचले आहे. चीन यापेक्षा कितीतरी पट समोर आहे. यामुळे भारताचा विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधनासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा डोलारा कोसळल्याची टीका त्यांनी केली. भारतामध्ये प्रचंड क्षमता असूनही राजकीय नेतृत्वामुळे रोजगार निर्मिती, विकास दर वाढविण्यात अपयशी ठरलो आहोत, अशी टीका करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र