शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजनांसाठी नवा आराखडा  : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:08 IST

नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्दे पाणी साचण्यावर तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.पावसाचे पाणी साचणारी शहरातील ६६ ठिकाणे आहेत. यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीच्या कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच उपायोजना हाती घेतल्या जातील . पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७०० पेक्षा अधिक लोकांना अग्निशमन विभाग व एनडीआरएफच्या पथकांनी सुरक्षिपणे बाहेर काढल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिली.शुक्र वारी रात्री १२ वाजेपर्यत शहरातील पूरग्रस्त व पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी रात्री उशिरापर्यत कार्यालयात होते. वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. संकटग्रस्तांनी मदतीसाठी संपर्क साधताच तातडीने उपलब्ध करण्याचे मदत व बचाव पथकाला निर्देश दिले जात होते.शुक्रवारी शहरातील २७ ठिकाणी पाणी साचले होते.मेडिकल चौक, पडोळे हॉस्पिटल जवळील चौकात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. तसेच काही वस्त्यातही अशीच समस्या निर्माण होते. यावर तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तुंबलेली गटारे व पावसाळी नाल्यात साचलेला गाळ व कचरा काढण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. पुन्हा मुसळधार पाऊ स पडल्यास आपत्ती निवारण विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी दिली.पावसाळा संपताच नाल्या सफाईगटारे व पावसाळी नाल्या साफ करण्याला बराच कालावधी लागतो. याचा विचार करता पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यात गटारे व नाल्या सफाईच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पाणी साचण्याची समस्या उद्भवलेल्या भागासह शहराच्या सर्वच झोनमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त