शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघिणीला बेशुद्ध करण्याचा नवीन आदेश शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 20:26 IST

स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा नवीन आदेश जारी करता येईल. परंतु, त्यापूर्वी याचिकाकर्ते स्वानंद सोनी यांना सुनावणीची संधी देण्यात यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.

ठळक मुद्देहायकोर्ट : याचिकाकर्त्याला मिळेल सुनावणीची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा नवीन आदेश जारी करता येईल. परंतु, त्यापूर्वी याचिकाकर्ते स्वानंद सोनी यांना सुनावणीची संधी देण्यात यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी गेल्या २० मार्च रोजी वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा आदेश जारी केला होता. त्याविरुद्ध स्वानंद सोनी यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पहिल्याच सुनावणीनंतर वादातीत आदेशावर स्थगिती देऊन वन विभागाला स्पष्टीकरण मागितले. दरम्यान, १० एप्रिल रोजी त्या आदेशाची मुदत संपली. त्यामुळे न्यायालयाने वरील बाबी स्पष्ट करून याचिका निकाली काढली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.वाघिण सध्या सिंदेवाही परिसरातील शेतांमध्ये फिरत आहे. वाघिणीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वाघिणीचा माणसांशी संघर्ष होऊ नये यासाठी तिला बेशुद्ध करून पकडण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. तिला पकडून जंगलात सोडण्याचा वन विभागाचा उद्देश होता. तो आदेश अवैध होता, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. वाघिणीला चार बछडे आहेत. बेशुद्ध करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ते एकमेकांपासून दुरावू शकतात. बछड्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक व अ‍ॅड. राहुल कलंगीवाले तर, वन विभागातर्फे अ‍ॅड. मेहरोज पठाण यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTigerवाघ