शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट जिल्हा म्हणून नागपूरची राज्यात नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:15 IST

शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्र राज्याचा ५८ वा वर्धापनदिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.महाराष्ट्र राज्याच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त कस्तूरचंद पार्क येथे मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस दलातर्फे परेड कमांडर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विशाल ढोणे यांनी मानवंदना दिली.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नागपूर शहराची निवड झाली असून १००२ कोटीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन असे सहा प्रकल्पही प्रस्तावित आहेत. नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.बॉक्स..उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरवयावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत शहीद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेचे स्मार्ट कार्ड अनुराधा एस.देव, प्रीतम हरबंस कौर, स्मिता शशीकांत जुनघरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सुनील सीताराम मोवाडे भिवापूर तहसील यांना रोख पाच हजार व प्रशस्तीपत्र देण्यात आले, भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने मिठी मनोज राठी, गार्गी राहुल कुलकर्णी, निधी विजय भोयर, श्रावणी लक्ष्मीकांत पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनnagpurनागपूर