शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दलालांचे जाळे सर्वत्र

By admin | Updated: June 14, 2014 02:56 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सेतू केंद्रावर अधिकाऱ्यांनी छापा घालून दलालांची धरपकड केली असली तरी ...

नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सेतू केंद्रावर अधिकाऱ्यांनी छापा घालून दलालांची धरपकड केली असली तरी अशाच प्रकारचे दलाल इतर विभागातही सक्रिय आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.दर उन्हाळ्यात सेतू केंद्रात विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढते. त्याचा फायदा घेणारे दलाल सक्रिय होतात आणि जिल्हा प्रशासनाकडून आकस्मिक तपासणी करून कारवाई केली जाते. त्यानंतर मात्र पुन्हा जैसे थे स्थिती होत असल्याचे चित्र दरवर्षीचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दलालांची सक्रियता फक्त सेतू केंद्रापुरती मर्यादित नाही. शिधापत्रिका तयार करायची असेल, निराधारांच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, अकृषक परवाने, तहसील कार्यालयातील विविध प्रमाणपत्रे प्राप्त करायचे असेल तर दलालाच्या मार्फत गेले की हमखास कामे होतात, असे छातीठोकपणे सांगणारी मंडळी वाहनतळावरच सापडतात. तहसील कार्यालय असो किंवा खनिकर्म, जमिनीच मोबदला प्राप्त करायचा असो किंवा जमिनीशी संबंधित इतर कामे असो, प्रत्येक ठिकाणी दलाल सक्रिय आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या निराधाराच्या योजनांचा लाभ पदरी पाडून घेण्यासाठी दलालांमार्फतच जावे लागते. सेतू केंद्राप्रमाणेच या विभागातील दलालांचीही धरपकड झाली तर त्यावर काही प्रमाणात निर्बंध लागू शकेल, असे सूत्र सांगतात.दर उन्हाळ्यात सरकारी कार्यालयात कुलर्स लावण्यापासून तर निवडणुकीच्या काळात मंडप कुणी टाकावा इथपर्यंत माणसे ठरलेली आहेत. निविदा काढणे, मंजूर करणे व नंतर कंत्राट देणे हे सर्व सोपास्कार पार पाडले जात असले तरीही या संपूर्ण प्रक्रियेत दलालांची भूमिका महत्त्वाची ठरते. सेतू केंद्रातील गर्दी कमी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शाळा-महाविद्यालयात विविध प्रमाणपत्रांसाठी विशेष शिबिर घेण्याचा उपक्रम राबविला होता. हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला असता तर विद्यार्थी किंवा पालकांना सेतू केंद्राकडे फिरकण्याची गरजही भासली नसती. अधिकारी बदलले की त्यांनी सुरू केलेले उपक्रमही बंद पडतात. तसाच प्रकार या शिबिराच्या बाबतीतही घडला. शासानाने महाआॅनलाईन केंद्र सुरू केले. मात्र त्याची माहितीच जनतेपर्यंत पोहोचू नये, अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सेतूवर भार वाढला व त्यातून दलालांची सोय झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू प्रमाणेच इतर विभागाचीही आकस्मिक तपासणी करून तेथील दलालांना हद्दपार करावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)