शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नेपाळी रुग्णाला मायदेशी पोहचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:20 IST

नेपाळ येथील एका व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार केल्यावर त्यास त्याच्या मूळ स्थानी (नेपाळ) येथे सोडून देण्याचे प्रशंसनीय कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक विभाग व विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार व विभागाचे डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकाराने व मन्नत सामाजिक संस्थेच्या सहकार्याने केले.

ठळक मुद्देसमाजसेवा अधीक्षक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार : मन्नत संस्थेचा मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेपाळ येथील एका व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार केल्यावर त्यास त्याच्या मूळ स्थानी (नेपाळ) येथे सोडून देण्याचे प्रशंसनीय कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक विभाग व विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार व विभागाचे डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकाराने व मन्नत सामाजिक संस्थेच्या सहकार्याने केले.शेजारील राष्ट्र नेपाळ येथून रोजगाराच्या शोधात अनेक लोक मध्य भारतात येतात.फेकराज लिंबू हे नेपाळातून नागपूरला उदरनिवार्हासाठी आले होते.६ मे २०१९ रोजी कडक उन्हाळ्याच्या काळात त्यांचा अपघात झाला. पायाला मोठी इजा झाली होती. त्यांच्या पायाचे हाड मोडले होते. ‘१०८ रुग्णवाहिका सेवे'च्या माध्यमातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता व ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शिवाय लिंबू यांना यकृताच्या आजाराने ग्रासले असल्याने नंतरच्या उपचारासाठी प्रा. डॉ. बनसोड यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले. रुग्णाला कुणीही आप्त व मित्र परिवार नसतानाही रुग्ण ठणठणीत बरा झाला. तसेच खर्च करण्याची परिस्थिती नसल्यास त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर होता. त्यासाठी समजासेवा अधीक्षकांमार्फतही विशेष प्रयत्न करण्यात आले होते. शिवाय नागपुरातील अनेक सामाजिक संस्थांमध्येही जागा उपलब्ध नव्हती. दरम्यान, रुग्णाविषयीची विस्तृत माहिती नेपाळ पोलिसांना देण्यात आली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लिंबू यांच्याबद्दल माहिती प्रसारित करण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने डॉ. अविनाश गावंडे व डॉ. नारलावार यांनी डॉ. सजल मित्रांच्या मार्गदर्शनात लिंबू यांना नेपाळमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान मन्नत सामाजिक संस्थेचे केदार अंबोकर यांनी लिंबू यांना नेपाळ येथे सुरक्षितपणे सोडण्याची जबाबदारी स्वीकारली. यासाठी लागणारा खर्च समाजसेवा अधीक्षकांनी निधी गोळा केला तसेच डॉ. अविनाश गावंडे यांनीसुद्धा आर्थिक सहकार्य केले. तसेच उर्वरित खर्च करण्याची तयारी मन्नत सामाजिक संस्थेने दर्शविली. अशाप्रकारे सगळ्यांच्या संयुक्त सहकार्यातून फेकराज लिंबू यांना नेपाळ येथे पोहचविण्यात आले. त्यांना १० जून रोजी नेपाळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.फेकराज लिंबू यांनी शुश्रुषा आणि नेपाळ येथे पोहचविण्यास सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्या रुग्णांना कुणी आप्तस्वकीय नसतात त्या रुग्णांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून उपचार करण्याचे प्रशंसनीय कार्य करण्यात येते. या कृतीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व समाजसेवा अधीक्षक विभागावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :NepalनेपाळGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय