शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली मरकज संमेलनातून परतलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:33 IST

दिल्ली मरकज संमेलनातून परत आलेल्या आणखी एका व्यक्तीची कोरोना विषाणू संक्रमणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा व्यक्ती शहरातील एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देआणखी चार जण आले समोर : तपासणीनंतर नऊ लोक क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली मरकज संमेलनातून परत आलेल्या आणखी एका व्यक्तीची कोरोना विषाणू संक्रमणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा व्यक्ती शहरातील एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी लोकांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची लक्षणे आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ३० मार्च रोजी ही घटना समोर आल्यानंतर नागपुरातही खळबळ उडाली. दिल्ली मरकज संमेलनात सहभागी होऊन नागपूरला परत आलेल्यासातपैकी पाच जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यापैकी एकाचा रिपोर्ट अगोदरच निगेटिव्ह आलेला आहे. गुरुवारी पुन्हा एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.नागपूर मरकजमधून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सात लोक मरकजच्या संपर्कात राहून अधिकृतपणे दिल्ली मरकज संमेलनात सहभागी व्हायला गेले होते. यापैकी पाच लोकांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे. तीन जणांचा अहवाल अजून यायचा आहे, तर दोघांची तपासणी व्हायची आहे. हे सर्वजण ११ मार्च रोजीच नागपूरला परतले होते.इतर चार जणही गेले होते दिल्लीलानागपूर मरकजनुसार, मरकजच्या सात जणांशिवाय इतर चार जणसुद्धा ऑफिशियली दिल्लीच्या संमेलनासाठी गेले होते. या चौघांचीही कोरोना विषाणूसंदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल अजून यायचा आहे. नागपूर मरकजच्या सात सदस्यांपैकी तपासणी केलेल्या पाच आणि इतर चार अशा एकूण नऊ जणांना तपासणीनंतर आमदार निवासातील क्वारंटाईन कक्षात पाठवण्यात आले आहे.चंद्रपूरमधील एका व्यक्तीचीही तपासणीचंद्रपूर येथील इतर एका व्यक्तीचीही कोरोना विषाणू संसर्गाबाबतची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर त्यालाही आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले आहे. नागपूर मरकजकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती ६ मार्च रोजी चंद्रपूरवरून दिल्ली मरकज संमेलनात सहभागी झाला होता. परत आल्यानंतर त्याला नागपूरला आणले गेले. मेयो रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल यायचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर