शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी स्वतंत्र एमआयडीसीची गरज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आदिवासींसाठी स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे विधानसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आदिवासींसाठी स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

एका कार्यक्रमासाठी ते नागपूरला आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना झिरवाळ म्हणाले की, आदिवासींच्या अनेक अडचणी आहेत. त्यांच्या बेरोजगारीसोबत शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे. हा सोडविण्यावर भर राहणार आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. आदिवासी भागात सिंचनाची सोय करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना शेतीस मदत होईल. यासाठी लहान प्रकल्प हाती घेण्याच्या सूचना विभागाला करण्यात येतील. अनुसूचित जमाती, जाती, इतर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांचा आहे. हा प्रश्न निकाली काढण्यास मंत्रिगटाने मंजुरी दिली आहे. लवकर पदोन्नती देण्यात येईल, असे ते म्हणाले. डीबीटीला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. आदिवासी मंत्री वळवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे मतही डीबीटीच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉक्स

१२ आमदारांच्या नियुक्तीच्या विलंबासाठी काहीच कारण नाही. १२ आमदारांच्या नियुक्तीला होत असलेल्या विलंबाबाबत विचारले असता १२ आमदारांची यादी मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्यपालांकडे सादर केली आहे. या नियुक्तीला सहसा इतका वेळ लागत नाही. या आमदारांच्या नियुक्तीच्या बिलंबाबाबत राज्यपालांकडे कुठलेही कारण नाही, असे विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.