शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

देशाला हिंदू राष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज : कन्हैय्या कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:55 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर या देशात सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नसती. ब्राह्मण आणि दलित एकाच बेंचवर बसून शिकू शकले नसते, ही या देशातील संविधानाची ताकद आहे. आज केवळ संविधानच नव्हे तर या देशातील जवान आणि शेतकरीही धोक्यात आहे. त्यांना वाचवण्याची गरज आहे. देशाला हिंदूराष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज आहे. त्यामुळे ही लढाई पक्ष-विपक्ष अशी नाही. तर मोदी विरुद्ध भारतातील लोकं अशी असून व्हॉट्सअ‍ॅपचा जितका वापर करता, तितकाच आपल्या बुद्धीचाही वापर करा, आणि एकजूट होऊन प्रबुद्ध भारत घडवा, असे आवाहन युवा नेता डॉ. कन्हैय्या कुमार याने येथे केले.

ठळक मुद्दे‘संविधानाचा जागर‘द्वारे युवकांना एकजूट होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर या देशात सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नसती. ब्राह्मण आणि दलित एकाच बेंचवर बसून शिकू शकले नसते, ही या देशातील संविधानाची ताकद आहे. आज केवळ संविधानच नव्हे तर या देशातील जवान आणि शेतकरीही धोक्यात आहे. त्यांना वाचवण्याची गरज आहे. देशाला हिंदूराष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज आहे. त्यामुळे ही लढाई पक्ष-विपक्ष अशी नाही. तर मोदी विरुद्ध भारतातील लोकं अशी असून व्हॉट्सअ‍ॅपचा जितका वापर करता, तितकाच आपल्या बुद्धीचाही वापर करा, आणि एकजूट होऊन प्रबुद्ध भारत घडवा, असे आवाहन युवा नेता डॉ. कन्हैय्या कुमार याने येथे केले.बहुजन विचार मंचतर्फे रविवारी मानकापूर स्पोर्ट्स स्टेडियम येथे ‘मेरी शक्ती-मेरा संविधान’ हा संविधान जागर असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर होते. तसेच काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड, माजी महापौर अटलबहादूर सिंग प्रमुख अतिथी होते. यावेळी डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘संविधान निष्ठांनो एकत्र या’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.डॉ. कन्हैय्या कुमार याने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकरावर चौफेर टीका केली. तो म्हणाला, सध्या गाय माताच्या नावावर राजकारण सुरु आहे. खुर्चीचा धंदा चालवला आहे. या देशातील निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक यासारख्या संस्थांना नेस्तनाबूत केले जात आहे. स्कील इंडियाच्या नावावर कील इंडिया सुरु आहे. पूर्वी राजकीय पक्ष हे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर चालत होते. परंतु आता ते न्यूज अँकरच्या भरवशावर चालत आहे. या देशातील मुख्य प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्याने यावेळी केली.अध्यक्षीय भाषणात डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, की यानंतरची लढाई ही धर्म आणि संविधान अशीच होणार आहे. त्यासाठी संविधाननिष्ठांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.नितीन राऊत म्हणाले, ते हुंकार रॅली काढत असतील तर आम्ही संविधान जागर करून या देशातील युवकांना जागृत करू. आ. जितेंद्र आव्हाड यांनीही मोदी सरकारवर टीका करीत या देशात सर्व काही बदलू शकते पण संविधान नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसचे महापालिकेचे गटनेते प्रफुल्ल गुडधे यांनी प्रास्ताविक व भूमिका विषद केली. संचालन प्रा. अनमोल शेंडे यांनी केले. नरेश जिचकार यांनी आभार मानले.हिंदूइझमवर आरएसएसला खुल्या चर्चेचे आव्हानकन्हैय्या कुमार याने यावेळी आरएसएसला हिंदूइझमवर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले. तो म्हणाला, भगवा रंग हे वीरतेचे प्रतीक आहे, कायरतेचे नव्हे. हा रंग दुसऱ्यांना वाचवण्याचा आहे, मारण्याचा नाही. हा रंग शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बुद्धाचा रंग आहे. रामाच्या नावावर राजकारण केले जात आहे. नागपूर ही आरएसएसची संघभूमी नव्हे तर आंबेडकरांची दीक्षाभूमी होय, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.मोदींना खोटे बोलण्याचे नोबेल पारितोषिक मिळावेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे सराईत खोटे बोलतात. त्यांना खोटे बोलण्याचे नोबेल पारितोषिक मिळायला हवे, अशी टीकाही कन्हैय्या कुमारने केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्याने प्रहार केला. ते योगी नसून ढोंगी आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारnagpurनागपूर