शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एसटीचे शासनात विलिनीकरणासाठी लढा देण्याची गरज : शीला नाईकवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:55 IST

एसटी महामंडळ आर्थिक टंचाईत सापडले आहे, आवश्यकता नसताना खासगीकरण करण्यात येत असून या सर्व बाबींवर उपाय म्हणून एसटीचे शासनात विलिनीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी केले.

ठळक मुद्देनागपूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : एसटी महामंडळ आर्थिक टंचाईत सापडले आहे, आवश्यकता नसताना खासगीकरण करण्यात येत असून या सर्व बाबींवर उपाय म्हणून एसटीचे शासनात विलिनीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी केले.एसटी कामगार संघटनेच्या नागपूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा आग्याराम देवी चौकातील गुरुदेव सेवाश्रमात आयोजित करण्यात आला. यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्य महिला उपाध्यक्ष आशा घोलप होत्या. व्यासपीठावर संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले, विभागीय अध्यक्ष प्रशांत बोकडे, कोषाध्यक्ष रवी सोमकुवर, जगदीश पाटमासे, शशिकांत वानखेडे उपस्थित होते. शीला नाईकवाडे यांनी महिलांचे सक्षमीकरण, संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. एसटीचे शासनात विलिनीकरणासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती येथून निर्भया परिक्रमा नागपुरात दाखल झाली. महिला मेळाव्यात कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचाराचा कार्यस्थळावर होणारा परिणाम याबाबत महिला कामगारांमध्ये जाणीव जागृती करून प्रश्नावलीच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधण्यात आला. मेळाव्याला नागपूर विभागाच्या मीना केने, माधुरी ताकसांडे, सीमा जिल्लेला आणि विभागातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मेळाव्यात उज्ज्वला पिंगळे, सरु सातपुते, सुनिता बेदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मीना केने-बोंद्रे यांनी केले. संचालन दीपाली गुजरकर यांनी केले. आभार माधुरी ताकसांडे यांनी मानले.

टॅग्स :state transportएसटीWomenमहिला