शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

देशाच्या विकासासाठी वेगळ्या दृष्टीची गरज

By admin | Updated: January 12, 2015 00:59 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती.

अरुणकुमार : अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख राष्ट्र साधना संमेलनयवतमाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती. मात्र आज ते देश विकासाच्या बाबतीत पुढे निघून गेले. मात्र आपण विकासाची दृष्टी नसल्याने मागे राहलो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अरूण कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या राष्ट्र साधना संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.यवतमाळातीेल पोष्टल ग्राउंड मैदानावर रविवारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृषी भूषण शेतकरी आणि निसर्ग चळवळीचे सुभाष शर्मा होते. यावेळी मंचावर बापूराव तायडे, दादाराव भडके, सुरेश गोफने, सुखदेव ढवळे, सुरेंद्र खोडवे, अण्णाजी कुरडे, प्रदीप वडनेरकर, विजय कोषटवार होते. अरूण कुमार पुढे बोलताना म्हणाले, भारताच्या विकासासाठी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे पहिले लक्ष होते. देश गुलामगिरीतून मुक्त झाला, पण इंग्रजी आणि त्यांच्या संस्कृतीत अधिक गुरफटल्या गेला. परिणामी आपला संपूर्ण विकास खुंटला. आतापर्यंत तीनवेळा वैचारिक परिवर्तन पहायला मिळाले. सन १९४७, १९७७ आणि २०१५ मध्ये हे परिवर्तन प्रामुख्याने जाणवले. केवळ जागृकतेनेच हे घडले. मात्र विकासाला दिशा देण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्या नाही. देशाला दिशा देण्याची गरज आहे. आज पर्यंत कुठलीही दिशा नसल्याने आपण पुढे गेलोच नाही. चीन, जपान, जर्मनी यासारखे देश एक दृष्टी समोर ठेवून पुढे गेले आहेत. आपल्यालाही अशीच दिशा समोर ठेवून काम करायचे आहे. यासाठी कुठलाही एक व्यक्ती परिवर्तन घडवू शकणार नाही. समाजाचे मोठे योगदान आवश्यक लागणार आहे. हे वैचारीक परिवर्तन घडविण्यासाठी स्वयंसेवकांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. देशातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सकारात्मक विचार वाढायला हवेत. आपल्या पतनासाठी आपन स्वत: कारणीभूत आहोत. कुठलाही देश याला जबाबदार नाही. पूर्वी श्रीमंत होण्यासाठी लोक भारतात येत होते. आता आपण विदेशात जातो. हे कशामुळे होत आहे. आपले मुलभूत चक्र नष्ट करण्याचे काम झाले. यामुळे आपण माघारलो असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार भावना गवळी, हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)