शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज

By admin | Updated: May 25, 2014 00:53 IST

बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली पण त्यांना स्वजनांसह इतरांचाही त्रास सहन करावा लागला. धम्मदीक्षेपूर्वी सोलापूरच्या सभेत दादासाहेब गायकवाडांनीही बाबासाहेबांना विरोध केला.

भंते विमलकीर्ती गुणसिरी : २२ प्रतिज्ञा आचरण व मानवमुक्तीचे अभियान ग्रंथाचे प्रकाशन

नागपूर : बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली पण त्यांना स्वजनांसह इतरांचाही त्रास सहन करावा लागला. धम्मदीक्षेपूर्वी सोलापूरच्या सभेत दादासाहेब गायकवाडांनीही बाबासाहेबांना विरोध केला. डॉ. आंबेडकरांचे अनुयायीही धम्माची दीक्षा घेण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळेच बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात त्यांचे जवळचे शिलेदार मंचावर दिसत नाहीत. आजही आपण बाबासाहेबांना समजून घेण्यात चूक करतो आहोत. आपण बाबासाहेबांवर नितांत आणि प्रामाणिक प्रेम करतो पण त्यांनी सांगितलेला उपदेश पाळत नाही. घरात देवतांच्या मूर्ती ठेवून बौद्ध धम्म समजणार नाही. यासाठी भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत भंते विमलकीर्ती गुणसिरी यांनी व्यक्त केले.

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियानांतर्गत अरविंद सोनटक्के यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन आणि सीडीचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उर्वेला कॉलनी येथे पार पडला. याप्रसंगी भंतेजी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बुद्ध धम्माचे निर्दालन करण्यासाठी त्याकाळी ब्राह्मणी धर्माने मुस्लिम आक्रमकांशी संधान बांधून स्वत:ला सुरक्षित केले. त्यामुळे भारतात बुद्ध धम्म लयाला गेला. त्यानंतर विषमता असणार्‍या हिंदू धर्मात जाण्यापेक्षा समता असलेल्या मुस्लिम धर्मात बौद्ध धम्माचे लोक गेले. हा इतिहास आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा काय आहेत. ते समजून घेऊन त्यांचे पालन करण्याची वृत्ती बाळगावी लागेल, असे ते म्हणाले. इ. एस. खोब्रागडे म्हणाले, बुद्ध धम्माच्या प्रसाराचे हे आंदोलन सातत्य राखून आहे. हा ग्रंथ त्याचाच एक भाग आहे. या प्रतिज्ञांचे सूत्र आपण समजून घेतले पाहिजे. दैववादाचे भूत बहुजन समाजावर आहे. मनुवादी व्यवस्था टिकविण्याचेच काम बहुजन करीत आहेत. त्यामुळेच बाबासाहेबांचा विचार समाजात नेऊन विज्ञानवादी विचार पेरण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कृष्णकांत इंगळे म्हणाले, नशीब, आत्मा या बाबींना विज्ञानात काहीच अर्थ नाही. नशीब हातावर लिहिले असते तर मेडिकलमध्ये अनेक बेवारस प्रेत येतात. त्यांचे भाग्य का कुणीच सांगत नाही. मेडिकलमध्ये काही स्त्रीरोगतज्ज्ञ अमावस्या आहे म्हणून ऑपरेशन करीत नाहीत. कुणाचा मृत्यू झाल्यावर बौद्ध लोकही मृतात्म्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. हा विज्ञानवाद नाही.

बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत करण्यासाठी त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

हनुमंत उपरे म्हणाले, सध्याची पिढी बुद्धाचा धम्म समजून घेत आहे आणि धम्माची धारणा करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. आजच्या पिढीला पोटजातींबद्दल माहिती नाही आणि त्याची गरजही राहिलेली नाही. यातून निकोप समाजाचे स्वप्न निर्माण होण्यास मदत होईल. मुळात धम्म स्वाकारणे हे धाडसाचे काम आहे. धम्माची लकेर वाढविली आणि योग्य प्रसार केला तर हिंदू धर्मच या देशात संपेल. जेथे अंधश्रद्धा आहे तेथे विषमता राहणारच. हिंदू धर्मात दैववादाच्या, नशिबाच्या अंधश्रद्धा आहेत.

हिंदू आणि राज्यघटना या देशाच एकत्र नांदू शकत नाही. हिंदू धर्मावर विश्‍वास ठेवून धम्माची धारणा होणार नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात अभ्यासक उपस्थित होते. (प्रतिनिधी)