शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

दहशतवादापासून मुक्तीसाठी जागरुकता आवश्यक

By admin | Updated: October 4, 2015 03:28 IST

मुस्लीम समाज परस्पर विरोधी विचारधारांमुळे दहशतवादाप्रति अपेक्षित असल्याप्रमाणे सजग होऊ शकला नाही.

मुस्लीम धर्मगुरूंचे मत नागपूर: मुस्लीम समाज परस्पर विरोधी विचारधारांमुळे दहशतवादाप्रति अपेक्षित असल्याप्रमाणे सजग होऊ शकला नाही. यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. देशातील काही समित्या आणि संस्थानही यासाठी जबाबदार आहेत. काही विदेशी समित्याही दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत.या गंभीर समस्येपासून सुटका करण्यासाठी मुस्लिम समुदायाला जागरूक करणे अतिशय आवश्यक आहे, असे मत अहल्ले सुन्नत वक्फ प्रोटेक्शन कौन्सिलच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीत सहभागी मुस्लीम धर्मगुरूंनी व्यक्त केले. भालदारपुरा येथील हज हाऊस येथे समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या बैठकीत देशभरातील मुस्लिम धर्मगुरूंचा सहभाग होता. यापूर्वी मुस्लिम धर्मगुरूंच्या केंद्रीय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीदेखील दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा केली होती. वर्तमान स्थितीत सुन्नी वक्फ बोर्डाला केवळ सुन्नी बरेली मुस्लिम वक्फ बोर्डपर्यंतच सीमित ठेवावे. स्वतंत्रपणे शिया वक्फ बोर्ड आहे. त्याप्रमाणेच अन्य दुसऱ्या विचारधारेच्या मुस्लिमांसाठी वेगळा आणि स्वतंत्र वक्फ बोर्ड तयार करावा, अशी मागणी पंतप्रधानांना त्यावेळी धर्मगुरूंनी केली होती. अहले सुन्नत वक्फ प्रोटेक्शन कौन्सिलचे महासचिव इंजिनिअर मोहम्मद हामिद म्हणाले, देशातील ८५ टक्के मुसलमान अहले सुन्नत बरेली विचारधारेचे आहेत. हे मुस्लीम सुफीवाद मानतात. पण वक्फ बोर्डाला असलेल्या राजकीय संरक्षणामुळे बहुसंख्यक मुस्लिम विचारधारेचे लोक मागे पडतात. वस्तुत: दरगाह, खानकाहो यांची देखरेख अहले सुन्नत विचारधारेचेच लोक करतात. राजांच्या काळापासूनच सारी वक्फ प्रॉपर्टी सुन्नी बरेली मुस्लिमांची आहे. त्यामुळे त्यावर बरेली सुन्नी विचारधारेच्या लोकांचाच अधिकार असायला हवा. मोहम्मद हामिद यांनी दावा केला की, बोको हरम, अल-कायदा, तालिबान, हिजबुलसारख्या दहशतवादी संघटन मुस्लिम समुदायातील काही युवकांची दिशाभूल करून देशात दहशतवादी कारवाया वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. काही समित्या आणि संस्थानांची या दहशतवादी संघटनांशी साठगाठ असण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. सुन्नी वक्फ बोर्डात सुन्नी बरेली मुस्लिमांचे नेतृत्व असल्याशिवाय या कारवाया थांबविणे कठीण आहे. यासंदर्भात त्यांनी ठोस अधिकृत पुरावा मात्र जाहीर केला नाही. याप्रसंगी अजमेर शरीफ दरगाहचे सज्जादानशी सय्यद सुलतान हसन चिश्ती, बरेली शरीफ (उत्तर प्रदेश)चे मौलाना तसलीम रजा, किछौछा शरीफ (उत्तर प्रदेश) दरगाहचे सज्जादानशी सय्यद अहमद अशरफ, बनारसचे शहर काजी मुफ्ती गुलाम यासीन, मध्य प्रदेशचे सूफी सैयद अब्दुल रशीद अली, चैन्नईचे मौलाना सैयद मन्सूर, जम्मू-काश्मीरचे मौलाना गुलजार, हैदराबादचे सैयद सूफी सलिम चिश्ती कादरी, झारखंडचे मौलाना इल्यास फैजी, कोलकाताचे मौलाना रईसूल कादरी, छत्तीसगडचे हारुन मेमन, हाजडी कादीर रिजवी आदी धर्मगुरु प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)