शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची गरज : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:16 IST

जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देकिसानपुत्र आंदोलनाचे आजपासून दुसरे अधिवेशन

आॅनलाईन लोकमतनागपूर : जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.जनमंच संस्थेच्या सहकार्याने किसानपुत्र आंदोलनचे द्वितीय अधिवेशन येत्या ६ व ७ जानेवारीला नागपूर येथील आमदार निवास येथे होणार आहे. हबीब यांनी या उपक्रमाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले, कमाल जमीन धारण कायदा, अधिग्रहण कायदा आणि जमिनीसंदर्भातील इतर कायदे शेतकऱ्यांना घातक असून शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. काँग्रेसने हे कायदे केले असून डाव्यांनी याला समर्थन दिले. तर आता भाजप याची अंमलबजावणी करीत आहे. कमाल जमीन कायद्यानुसार शेतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र सरकार जमीन संपादित करून उद्योगपती, संस्थांना देते. अशाप्रकारे सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन उद्योगपतींच्या घशात घातली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न भाववाढीपुरता मर्यादित ठेवला जातो. मात्र असे अनेक शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शरद पाटील, श्रीकांत दौंड, अमिताभ पावडे, संजय भरडे आदी उपस्थित होते.अधिवेशनाचे उदघाटन  आजजनमंचच्या सहकार्याने आयोजित किसानपुत्र आंदोलनाचे दुसऱ्या अधिवेशनाचे उदघाटन  ६ जानेवारीला सकाळी १० वाजता आमदार निवास येथे होणार आहे. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या : कारणे व उपाय’ विषयावर प्रश्नोत्तरे व गटचर्चा होणार आहे. दुपारी २ वाजता ‘शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या’ विषयावर गटचर्चा तर दुपारी ४ वाजता ‘कमाल जमीन धारण कायदा’ विषयावर अमर हबीब यांचे व्याख्यान होईल. ७ जानेवारीला जमीन अधिग्रहण कायदा व अन्य शेतकरीविरोधी कायदे या विषयावर अ‍ॅड. महेश भोसले यांचे व्याख्यान तसेच ‘आवश्यक वस्तूंचा कायदा’ या विषयावर जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर यांचे व्याख्यान होणार आहे. विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून राज्यभरातून शेतकरी येथे सहभाग होणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर