शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:46 IST

सातत्याने वाढत असलेले पेट्रोल, डिझेलचे दर व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात करण्यात आलेली वाढ या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी संविधान चौकात निदर्शने केली.

ठळक मुद्देपेट्रोल, गॅसची दरवाढ थांबवा : संविधान चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सातत्याने वाढत असलेले पेट्रोल, डिझेलचे दर व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात करण्यात आलेली वाढ या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी संविधान चौकात निदर्शने केली. केंद्र सरकारने ही दरवाढ थांबविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या नेतृत्त्वात प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सलील देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने पेट्रोलचे दर दररोज निश्चित करण्याच्या नावावर भरमसाठ वाढ करून नागरिकांची फसवणूक केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमतही वाढविण्यात आली असून मार्चनंतर गॅससाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याचा बेत आखला आहे. महागाई वाढविणारी धोरणे राबवून मोदी सरकार गरिरबांसाठी अच्छे दिन कसे आणणार, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला.आंदोलनात दिलीप पनकुले, अनिल अहिरकर, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, योगेश कुंभलकर, चरणजित चौधरी,बजरंग परिहार, सुखदेव वंजारी, महेंद्र भांगे, विशाल खांडेकर, शैलेंद्र तिवारी, सतीश इटकेलवर, नूतन रेवतकर, अलका कांबळे, वर्षा शामकुळे, बबिता मेहर, लक्ष्मी सावरकर, उषा चौधरी, ज्योती लिगायत,उर्वशी गिरडकर, साधना श्रीवास्तव, ज्योती खोब्रागडे, अर्चना वायू, इंदू फुलझेले, सुरेश करणे, साहेबराव चौधरी,महादेव फुके, रिजवान अन्सारी, कादिर शेख, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर,अशोक काटले, अशोक आदीकने, देवानंद रडके,हेमंत भोतमांगे, प्रभूदास तायवाडे आदींनी भाग घेतला.