शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहन पाटील यांना मारहाण

By धीरज परब | Updated: December 22, 2022 21:55 IST

शिक्षण संस्थेतील वादातून हा हल्ला झाल्याचा पाटील यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव, मीरा भाईंदर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तसेच अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेचे माजी कार्याध्यक्ष असलेले मोहन पाटील यांना दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना भाईंदर पूर्वेला गुरुवारी घडली. शिक्षण संस्थेतील वादातून हा हल्ला झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. भाईंदर मधील आगरी समाजाच्या जुन्या व मोठ्या अश्या अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेत चाललेला वाद पोलीस ठाणे, धर्मादाय आयुक्त व  न्यायालयात सुरु आहे . दोन गटात हा वाद सुरु असून पाटील हे गुरुवारी त्यांचे वकील सुशांत पाटील यांच्यासह गाडीने धर्मादाय आयुक्तां कडे असलेल्या सुनावणी साठी चालले होते.

भाईंदर पूर्वेच्या फेमिली केअर रुग्णालया समोर गाडी असताना अचानक एका दुचाकी वरून दोन जण आले आणि गाडीला लाथा मारू लागले . पाटील यांनी गाडी बाजूला उभी करून त्यांना विचारणा केली असता आणखी तीन दुचाकी वरून ६ ते ७ जण आले . त्यांनी मिळून मोहन पाटील यांच्यासह ऍड . सुशांत पाटील व वाहन चालकास लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. वर्दळीचा रस्ता असल्याने आजू बाजूच्या लोकांनी धाव घेऊन पाटील आदींची सुटका केली . दरम्यान हल्लोखोर पळून गेले . या प्रकरणी मोहन पाटील यांनी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला. या आधी सुद्धा त्यांना धमक्या आल्या असून पोलिसात तक्रारी केल्या आहेत . अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाच्या जागेच्या वादातून ह्या आधी माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांची सुपारी देऊन निर्घृण हत्या झालेली आहे. आपल्या सुद्धा जीवाला धोका असून पोलिसांनी दिलेल्या तक्रारींचा व आताच्या घटनेचा गांभीर्याने तपास करून आरोपीना अटक करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :bhayandarभाइंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेस