शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

झोपेतच उडवून देण्याचा नक्षल्यांचा होता कट

By admin | Updated: May 14, 2014 14:17 IST

मुक्कामाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून पोलिसांना झोपेतच उडवून देण्याची माओवाद्याची योजना होती. मात्र, ‘तेथे‘ स्फोट घडविल्यास चोहोबाजूने टीका होईल, याची ...

 ऐनवेळी बदल : पोलिसांवर होती सूक्ष्म नजर

 

 

मुक्कामाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून पोलिसांना झोपेतच उडवून देण्याची माओवाद्याची योजना होती. मात्र, ‘तेथे‘ स्फोट घडविल्यास चोहोबाजूने टीका होईल, याची कल्पना आल्यामुळे माओवाद्यांनी बॉम्ब फेकण्याऐवजी सुरुंगस्फोट घडवून आणला, अशी खळबळजनक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. ‘लोकल‘ नाहीत. त्यामुळे ही स्फोटके नक्षल्यांना कुणी पुरवली, त्याची आता माहिती घेतली जात आहे. या एकूणच माहितीची शहानिशा करण्यासाठी गडचिरोली परिक्षेत्राचे डीआयजी रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याकडे विचारणा केली असता, चौकशी सुरू असल्यामुळे तूर्त काही बोलणे योग्य होणार नसल्याचे ते म्हणतात.

 

गडचिरोली जिल्ह्यातील मुरमुरी (ता. चामोर्शी) गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवून नक्षल्यांनी रविवारी सकाळी पोलिसांचे वाहन उडवून दिले. या स्फोटात सात पोलीस शहीद झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटाचे सर्वत्र कवित्व सुरू आहे.

 

हा स्फोट कुणी घडविला, कसा घडविला, पोलिसांनी हलगर्जीपणा केला का, येथपासून तो राजकारण्यांची अनास्था आणि या स्फोटानंतर त्यांनी दाखविलेला निगरगट्टपणा या मुद्यांपर्यंत चर्चेचा बाजार गरम आहे. स्फोट घडवून पोलिसांचे बळी घेणार्‍या माओवाद्यांचा तपास लावण्यात पोलीस अधिकारी गुंतले आहे. या पार्श्‍वभूमीवर, संबंधित सूत्रांचा कानोसा घेतला असता अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली.

 

त्यानुसार, स्फोटात शहीद आणि जखमी झालेले सी-६0 पथकाचे जवान नक्षलवाद्यांना हुडकून काढण्यासाठी तीन ते चार दिवसांपासून जंगलात पायपीट करीत होते. सुमारे १00 किलोमीटर जंगल तुडविल्यानंतर पोलीस पार्टीला तर नक्षलवाद्यांचा मागमूस लागला नाही.

 

नक्षलवाद्यांची मात्र या पोलिसांवर सूक्ष्म नजर होती. ते कुठून आले, कुठे थांबले, कधी आणि कोणत्या रस्त्याने परत जाणार, हे नक्षल्यांनी हेरले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलिसांनी मुरमुरी गावाजवळच्या शाळेत मुक्काम ठोकला. त्याचा नक्षल्यांना सुगावा लागला. त्यामुळे तेथे स्फोट घडवून झोपेतच पोलिसांचा बळी घेण्याचा कट नक्षल्यांनी रचला. मात्र, शाळेत स्फोट घडविल्यास सामाजिक परिणाम वाईट होतील. कोणत्याच घटकांकडून सर्मथन तर सोडा सहानुभूती मिळणार नाही, याची कल्पना आल्यामुळे नक्षल्यांनी पोलिसांवर बॉम्ब फेकण्याच्या योजनेत बदल केला. त्यांनी रात्रीतूनच पोलीस परत जाणार्‍या मार्गावर स्फोटके पेरली अन् स्फोट घडवून आणला. या कटातून नक्षल्यांनी आपले इप्सित साध्य केले.

 

स्फोटके कुणी पुरवली ?

 

सात पोलिसांचे बळी घेणार्‍या घटनेत नक्षल्यांनी जी स्फोटके वापरली, ती

 

नक्षलवादी पोलिसांच्या मागे अन् पुढेही !

 

पोलीस नक्षलवाद्यांना हुडकून काढण्यासाठी त्यांच्या नेहमी मागे असतात असे समजले जाते. मात्र, मुरुमुरीच्या स्फोटानंतर नक्षलवादी पोलिसांच्या मागे असतात. ते त्यांच्या हालचालीची पूर्णपणे माहिती ठेवतात अन् संधी साधून त्यांचे बळीही घेतात, हे पुन्हा एकदा या स्फोटाच्या घटनेने स्पष्ट केले आहे.