शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुंडासह नक्षल समर्थकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:59 IST

कुख्यात गुंड आणि नक्षल समर्थक इरफान चाचू तसेच नरेंद्र कोडापेसह १७ जणांना राजस्थानमध्ये जाऊन पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपाचपावली पोलिसांची अजमेरजवळ कारवाई १७ जणांना नागपुरात आणले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड आणि नक्षल समर्थक इरफान चाचू तसेच नरेंद्र कोडापेसह १७ जणांना राजस्थानमध्ये जाऊन पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या सर्वांना शनिवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. मात्र, ज्याच्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता, ते कुख्यात नौशाद आणि इरफान पोलिसांना चकमा देऊन अजमेर जवळून पळून जाण्यात यशस्वी ठरले.शहरातील कुख्यात आणि मुख्य गुन्हेगारांच्या टोळींपैकी एक असलेली इप्पा टोळी संचलित करणारा तसेच पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात गुंड नौशाद तसेच इर्शाद राजस्थानमधील अजमेरकडे गेल्याची माहिती पाचपावली पोलिसांना गेल्या आठवड्यात मिळाली होती. त्यावरून परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी कारवाईची तयारी केली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने तीन ते चार दिवस परिश्रम घेतल्यानंतर गुरुवारी आरोपी इरफान चाचू आणि नौशाद बीजनगरजवळ असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावरून पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने तिकडे धाव घेतली.बरीच धावपळ केल्यानंतर शुक्रवारी इरफान चाचू आणि अन्य १६ आरोपी पोलिसांच्या हाती लागले. नौशाद, इर्शाद त्यांच्या साथीदारांसह पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेले. ताब्यात घेतलेला इरफान चाचू हा कुख्यात गुंड असून तो तसेच त्याच्यासोबत पकडण्यात आलेला नरेंद्र कोडापे नक्षल समर्थक म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याचे पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी या सर्वांना शनिवारी मध्यरात्री नागपुरात आणण्यात आले.१२ जणांना सोडले, पाच जणांना अटकप्रारंभिक चौकशीत १७ पैकी ९ जणांवर एकही गुन्हा दाखल नसल्याने त्यांना तसेच तिघांवर किरकोळ गुन्हे असल्यामुळे त्यांनाही सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.तर इरफान चाचू (५ गुन्हे), नरेंद्र कोडापे (३ गुन्हे), इल्लू ऊर्फ शेख इलियास (३ गुन्हे), बग्गा १ऊर्फ जाफर खान (२ गुन्हे) आणि शाहबाज शेख यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी