नागपूर : नागपूर वन विभागाने ‘जपानी बागेत चला’ असा नारा देत सोमवारपासून येथील जपानीज गार्डनमध्ये नेचर वॉकला प्रारंभ केला. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना निसर्गासोबत समरूप होता यावे, त्यांना निसर्गाबद्दल आवड निर्माण व्हावी, स्वच्छ व शुद्ध हवा घेता यावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे.
वन विभागाचे प्रशासन अधीनस्थ संवर्ग विकास गुप्ता, उपवन संरक्षक प्रभु नाथ शुक्ल यांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सेमिनरी हिलचे एसीएफ सुरेंद्र काळे तसेच अजिंक्य भटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विकास गुप्ता म्हणाले, वन विभागाने युवकांना आणि विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहन द्यावे. या ठिकाणी असलेले वैविध्य, बागेची रचना, विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. प्रत्येक रविवारी सकाळी नेचर वॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटामध्ये किमान ३० जणांचा समावेश राहणार आहे.