शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी संपात अनेक संघटनांचा सहभाग, स्वतंत्र मजदूर युनियन संपाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 23:21 IST

देशभरातील १० केंद्रीय ट्रेड युनियनने एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी बंदला विविध कर्मचारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

ठळक मुद्देसीटू मोर्चा काढणार : विविध संघटनांचा पाठिंबा, संविधान चौकात निषेध सभा, कार्यालये पडणार ओस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरातील १० केंद्रीय ट्रेड युनियनने एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी बंदला विविध कर्मचारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सीटूने नागपुरातून मोर्चा काढण्याचे आवाहन केले असून संविधान चौकात सर्व संघटनांच्या निषेध सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. असे असले तरी स्वतंत्र विद्युत एम्लॉईज फेडरेशन आणि स्वतंत्र मजदूर युनियनने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शवून काळ्या फिती लावून काम करण्याचे जाहीर केले आहे. तर कास्ट्राईब महासंघाने संपाला अटींसह समर्थन दिले आहे. एकंदर या संपाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता शासकीय कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.केंद्र सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांचा विरोध व्यक्त करण्यासाठी देशातील १० केंद्रीय ट्रेड युनियन संघटनांनी १५० च्या वर औद्योगिक कामगार फेडरेशन यांनी एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी हे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मागील अनेक दिवसांपासून देशभरातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत. आश्वासने देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने पुकारलेल्या या संपामध्ये अनेक संघटना सहभागी होत आहेत.नागपूर सीटूसोबत संलग्नित असलेल्या अंगणवाडी कर्मचारी, मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह, कपास अनुसंधान केंद्र, निमवर्गीय कर्मचारी, नागपूर जनरल लेबर युनियन केम्सफिल्ड, मेटलॉक, अंकूर सिड्स, युनिज्युल्स, लाल बावटा, वाहतूक कामगार युनियन, स्पेसवूड कर्मचारी, महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईड्स युनियन, अभयारण्य जीप्सी चालक-मालक युनियन, लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन यांच्यासह ठेकेदार-कामगार यात सहभागी होत आहेत. खंडोबा मंदिर येथील सीटू कार्यालयातून सकाळी रॅली काढली जाणार असून तिचा समारोप संविधान चौकात सभेने होणार आहे.सीटू संलग्नील अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनीही या संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानिमित्त निघणाºया मोर्चामध्ये नागपूर शहर व ग्रामीणसह भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा व किमान २१ हजार रुपये वेतन देण्याची त्यांची मुख्य मागणी आहे.समाजकल्याण कर्मचारी संघटना (गट क) यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेल्याची माहिती विभागीय सचिव सुशील शिंदे यांनी दिली आहे.स्वतंत्र मजदूर युनियन संपाबाहेरया संपाचे नेतृत्व आरक्षणविरोधकांकडे असल्याचा आरोप करीत स्वतंत्र विद्युत एम्लॉईज फेडरेशन आणि स्वतंत्र मजदूर युनियनने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या फेडरेशनशी संबंधित २२ राज्यातील विविध कामगार संघटना यात सहभागी होणार नसून या सर्व राज्यातील १० लाख कर्मचारी संपापासून दूर राहणार असल्याचे मुख्य संघटन सचिव एन.बी. जारोंडे यांनी कळविले आहे.कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटना काळ्या फिती लावून काम करणारकास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटननेने संपात सहभागी न होता पाठिंबा मात्र दिला आहे. संपाच्या दिवशी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहम चवरे यांनी दिली आहे.कास्ट्राईब महासंघाचे अटींसह समर्थनमुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार, कास्ट्राईब महासंघाने अटींसह संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष अरूण गाडे आणि महासचिव प्रभाकर जीवने यांनी ही माहिती दिली आहे.

टॅग्स :StrikeसंपEmployeeकर्मचारी