शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यातील बदलाविरोधात आज देशव्यापी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 01:28 IST

विविध राज्यांसह केंद्र शासनातर्फे कामगार कायद्यात होत असलेल्या बदलांबाबत कामगारांमध्ये असंतोष असून कामगार संघटनांनी याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यानिमित्ताने ३ जुलै रोजी देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध राज्यांसह केंद्र शासनातर्फे कामगार कायद्यात होत असलेल्या बदलांबाबत कामगारांमध्ये असंतोष असून कामगार संघटनांनी याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यानिमित्ताने ३ जुलै रोजी देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे.देशभरातील कामगार संघटना सरकारच्या या धोरणाविरोधात एकवटल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात लाखो श्रमिकांचा रोजगार गेला. अनेकांचे वेतन थांबले. अशात कोरोनाशी लढण्याचे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे कारण पुढे करीत काही राज्य शासनाने कामगार कायद्यामधील तरतुदींना तीन वर्षांची स्थगिती दिली आहे. म्हणजे या काळात उद्योजक, कंपनी मालकांना कामगार हिताच्या तरतुदी बंधनकारक नसतील. देशात सर्वात आधी उत्तर प्रदेश सरकारने याबाबत निर्णय घेतला. योगी आदित्यनाथ सरकारने कायद्यातील चार तरतुदी वगळता इतर सर्व तरतुदींच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्य प्रदेश शासनाने कामगार करार कायदा थेट एक हजार दिवसांसाठी रद्द केला. याशिवाय १० पेक्षा जास्त राज्यांनी कामाची वेळ ८ तासावरून १२ तास केली आहे. कायद्यात बदल करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, ओडिशा आदी राज्यांचाही समावेश आहे. आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले, केंद्र शासनाने ४४ कामगार कायद्याचे चार कोडमध्ये रूपांतर करीत असून सर्वच क्षेत्रात खासगीकरणाचे धोरण अवलंबिले आहे. याविरोधात कामगार संघटनांनी एकत्रित लढा पुकारला असून हे कायदे बदल मागे घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा संघटनांनी दिला आहे.आंदोलनात सहभागी संघटनाशुक्रवारी होणाऱ्या निषेध आंदोलनात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), हिंद मजदूर सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू), आॅल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर, ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटर,ऑल इंडिया सेंटर कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन, सेल्फ एम्प्लॉईड वूमेन्स असोसिएशन, लेबर प्रोग्रेसीव्ह फेडरेशन आदी संघटनांचा सहभाग आहे.संविधान चौकात आंदोलनशुक्रवारी संविधान चौक येथे सकाळी ११ वाजतापासून निषेध आंदोलन सुरू होणार आहे. आयटकसह सर्व संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती श्याम काळे यांनी दिली.

टॅग्स :Labourकामगारagitationआंदोलन