शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निकोपतेसाठी राष्ट्रसंतांचा विचार सार्वत्रिक

By admin | Updated: August 28, 2014 02:01 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार ग्रामीण व नागरी जीवन पातळीवर किती महत्त्वाचा आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. आजची मूल्यव्यवस्था, महानगरीय व्यवस्था

राजन गवस : ‘ राष्ट्रसंत : पुरोगामी साहित्यप्रवाहांचा प्रेरणास्रोत विषयावर चर्चासत्र’नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार ग्रामीण व नागरी जीवन पातळीवर किती महत्त्वाचा आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. आजची मूल्यव्यवस्था, महानगरीय व्यवस्था आणि ग्रामीण जीवनातील शैक्षणिक वातावरण यासंदर्भात राष्ट्रसंतांच्या साहित्याचा विचार केला तर अनेक प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळतात. त्यांच्या साहित्याचा विचार केला नाही तर ग्रामीण जनतेचा कडेलोट होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम काही स्वरूपात दिसायलाही लागले आहेत. सामाजिक निकोपता अखंड ठेवण्यासाठी राष्ट्रसंतांचा विचार सार्वत्रिकच आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन आज बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी चर्चासत्राचे उद्घाटन करताना बीज भाषणात डॉ. गवस बोलत होते. या चर्चासत्राचा विषय ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : पुरोगामी साहित्यप्रवाहांचा प्रेरणास्रोत’ असा होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव डॉ. गिरीश गांधी, अध्यासनाचे कार्यकारी प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. बोरकर, स्नातकोत्तर मराठी विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. डॉ. गवस म्हणाले, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत पण राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुसरण केले नाही तर भविष्यात लवकरच आय. टी, अभियंते, डॉक्टर्स आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या आत्महत्याही वाढतील. सध्याही अशा घटना आपण अनुभवतोच आहे. बिघडत चाललेले शैक्षणिक वातावरण त्याला कारणीभूत आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराचे अनुसरण केले तरच उद्याच्या आत्महत्या थांबतील. राष्ट्रीय पातळीवर ग्रामविकासाची जी धोरणे आखली जात आहेत, त्याची संहिताच राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून दिली आहे, असे ते म्हणाले. डॉ. देशपांडे म्हणाले, व्यवस्थापन आणि व्यवसाय शास्त्र, अर्थशास्त्रातील ग्रंथापेक्षा कितीतरी सजग विचार राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत मांडला आहे. ग्रामजीवनाचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी दिला. पण आपल्याच संतांकडे दुर्दैवाने आपले दुर्लक्ष होते आहे, असे ते म्हणाले.गिरीश गांधी म्हणाले, समाजातल्या तळागाळापर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचविण्याचे कार्य प्राध्यापकांनी हाती घ्यावे. विद्यार्थ्यांवर त्यांच्या विचारांचा संस्कार झाल्याशिवाय नवी पिढी तयार होणार नाही. हे काम प्राध्यापकच करू शकतात. आता केवळ विचारांची गरज नाही तर विचारांवर प्रात्यक्षिक करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे ते म्हणाले. डॉ. अक्षय काळे प्रास्ताविकात म्हणाले, राष्ट्रसंत पुरोगामी विचारांचा प्रेरणास्रोत आहे. यासंदर्भात अर्वाचीन कवींच्या सामाजिक विचारांची पार्श्वभूमी स्पष्ट करीत त्यांनी राष्ट्रसंताचा विचार किती खोल आणि आजच्या काळाला सुसंगत आहे, हे पटवून दिले. राष्ट्रसंत समाजातल्या प्रत्येक माणसाशी एकरूप झाले होते. केवळ ग्रामीण भागाचाच नाही एकूणच समाजाचा त्यांनी केलेला विचार आजही आम्हाला प्रेरणा देणारा आणि कार्य करायला उद्युक्त करणारा आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी तर आभार डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी मानले. (प्रतिनिधी)