शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

राष्ट्रीय क्रीडा दिवस; 'या' मूकबधिर धावपटूला हवे आर्थिक पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 10:48 IST

आहाराच्या कमतरतेमुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिचा वेग मंदावू नये, याचीही चिंता आहे. आहारासाठी समाजाचे पाठबळ लाभले तर माझी मुलगी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये नाव कमवेल,असा विश्वास आहे.

ठळक मुद्दे वेगवान शर्यतींसह सायकलिंग, जलतरणातही अग्रेसर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तिला बोलता येत नाही. ऐकायलाही येत नाही, मात्र खेळात कुठेही कमी नाही. वेगवान धावपटू म्हणून नावारूपास येत असलेली ही कन्या लांबपल्ल्याची शर्यतही सर करते. शिवाय सायकलिंग आणि जलतरण या खेळातही स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटविला. यंदा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णाची मानकरी ठरलेल्या या धावपटूचे नाव निधी विनोद तरारे.शंकरनगरच्या मूकबधिर विद्यालयात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या निधीचे अख्खे कुटुंब खेळात आहे. वडील विनोद आणि आई संगीता व्हॉलिबॉलपटू असल्याने मोठ्या मुलाला त्यांनी व्हॉलिबॉलचे धडे दिले. तो सध्या औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू म्हणून पुढे आला आहे. धाकटी निधी जन्मापासून बोलत नाही. सर्व उपाय करून थकल्यानंतर वडिलांनी तिला मैदानावर पाठविण्याचा निर्णय घेतला. या मुलीने सर्वसाधारण धावपटूंसोबत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलाच; शिवाय बधिरांच्या राष्ट्रीय स्पर्धेत ८०० आणि १५०० मीटर शर्यतीत विक्रमी वेळेसह सुवर्ण पदकांचा मान मिळविला. पचमढी येथे झालेल्या २१ किमी शर्यतीत ती उपविजेती होती. सायकलिंगमधये ४० किमी अंतर सहज पार करते. संभाजी भोसले यांच्या मार्गदर्शनात पट्टीची जलतरणपटू म्हणून पुढे आली. डेकथलॉनमध्ये तिने नाव कमविले आहे.जय अ‍ॅथ्लेटिक्स क्लबचे कोच सुनील कापगते आणि मूकबधिर शाळेच्या प्रमुख कमल वाघमारे हे निधीवर मेहनत घेतात. वडील खासगी काम करून निधीसाठी वेळ देतात. निधीला आहार म्हणून दूध, बदाम, कडधान्य, अंडी आणि फळे या गोष्टींची ज़ुळवाजुळव करताना फार ओढाताण होते असे सांगून तिचे वडील म्हणाले,‘जमेल तितके आम्ही करतो. तिच्या पायात बळ आहे, पण आहाराच्या कमतरतेमुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिचा वेग मंदावू नये, याचीही चिंता आहे. आहारासाठी समाजाचे पाठबळ लाभले तर माझी मुलगी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये नाव कमवेल,असा विश्वास आहे. निधीसारख्या अनेक गरजू खेळाडूंना समाजाने दातृत्वाचा हात दिल्यास हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळी गाठू शकतात.’कोच सुनील कापगते यांनीही निधीच्या क्षमतेचा गौरव करीत बोलता आणि ऐकता येत नसले तरी ही मुलगी जेव्हा धावण्याआधी लेनमध्ये उभी राहते तेव्हा इतरांच्या हालचाली पाहून वेग घेते. बघता बघता ती पुढेही निघून जाते. तिच्या करियरला उभारी देण्यासाठी मदतीचा हात हवा आहे. निधी खेळासोबतच अभ्यासातही हुशार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक