नागपूर : राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच महावीर वाॅर्ड, नागपूरने पोलीस बांधवांसोबत बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या भाऊबीजेचे आयोजन गोंदिया जिल्ह्यातील केशोरी गावात केले होते. पोलीस बांधवांना कल्पना सावळकर, नमिता उदेपूरकर, प्रिया बंड या भगिनींनी पंचारतींनी ओवाळून बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाला उजाळा दिला. पोलीस बांधवांना फराळाचे पाकीट, शंकरपाळे, नॅपकीन, मिठाई, मास्क, सॅनिटायझर देण्यात आले.
महिला मंचाच्या कार्यकर्त्या नमिता उदेपूरकर आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला केशोरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे, गोठणगाव कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक गोलवाल, अखिल भारतीय पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, अमरस्वरूप फाऊंडेशनचे विश्वस्त भुविश मेहता, माऊली मित्र मंडळाचे सुहास खरे, सेवा संस्थेचे सदस्य दिलीप ठाकरे, पुलक मंच परिवार शाखा अध्यक्ष शरद मचाले, अनंतकुमार शिवणकर, दिलीप सावळकर, कुलभूषण डहाळे, सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी, प्रशांत सवाने, राहुल मोहर्ले, सौरभ नायडू, दिनेश इंगळे, मयंक बंड, हवालदार इंदूरकर, देवारी, चौधरी, रामटेके, सारवे, खोटेले, कापगते आदी उपस्थित होते.