शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

National Inter Religious Conference: "दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे, येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 13:03 IST

National Inter Religious Conference : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेला सुरुवात झाली आहे.

नागपूर : आम्ही आपल्या धर्माचे इमानदारीने पालन केले पाहिजे, पण दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे. येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो. धर्म एका लिफाफ्यात ठेवलेला फळासारखा मधूर रस आहे. साल म्हणजे त्याचे सुरक्षतेसाठी असलेला संप्रदाय आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी दिले.

लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेला सुरुवात झाली आहे. यावेळी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, इराण, सिरिया या ज्या विचाराची आज सर्वाधिक आवश्यकता आहे, त्या विचाराला प्रत्यक्षात नागपूरच्या धर्तीवर उतरवण्यासाठी धर्मगुरू एकत्र आले आहे.  आजचा दिवस किती सुंदर आयोजित करण्यात आला आहे आणि सर्व धर्माचार्य करवा चौथच्या दिवशी नागपूरमध्ये येऊन देशाच्या सौदार्ह, भाईचारासीठी एकत्र प्रार्थना करत आहेत. दुवा करत आहेत आणि आज या विचाराला संपूर्ण जगाला गरज आहे.

याचबरोबर, आम्ही भाग्यशाली आहोत. ज्या भारतात आम्ही जन्म घेतला, अनेकतामध्ये एकता त्या देशाची मौलिक विशेषता आहे. सर्वधर्म सद्भाभाव त्याच्या मूलमंत्रात आहे आणि माझे हे सुद्धा परम सौभाग्य आहे की, मला जैन परंपरामध्ये भगवान महावीर यांचा जो विचार मिळाला. ज्याला अनेकांत दर्शन, ज्याला स्याद्वाद दर्शन म्हणतात. या स्याद्वादचा अर्थ हाच आहे की, आम्ही आपल्या अस्तिवात्वासोबत दुसरे अस्तित्व स्वीकारले पाहिजे. आम्ही आपल्या विचारांसोबत दुसऱ्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. आम्ही आपल्या धर्माचे इमानदारीने पालन केले पाहिजे, पण दुसऱ्या धर्मांचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे. येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो, असे आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले.

धर्म आणि संप्रदाय एक नाही आहे. धर्म एका लिफाफ्यात ठेवलेला फळासारखा मधूर रस आहे. साल म्हणजे त्याचे सुरक्षतेसाठी असलेला संप्रदाय आहे. वास्तवात पाहिले तर हा देश धर्मनिरपेक्ष नाही, तर पंथनिरपेक्ष आहे. मजब निरपेक्ष आहे. धर्म तर आपला आत्मा आहे, त्याच्यापासून आपण वेगळे कसे होऊ शकतो. ज्यावेळी व्यक्ती माझाच धर्म श्रेष्ठ आहे, माझा विचार सुद्धा श्रेष्ठ आहे, असे म्हणतो, त्यावेळी अडचणी येतात. ज्याठिकाणी सत्य आणि चांगले आहे, आम्ही त्याच्यासोबत आहेत आणि ज्याठिकाणी सत्य आणि चांगले नाही आहे, तिथे कोणताही धर्म असो किंवा पक्ष असो आम्ही त्यासोबत नाही आहोत, असेही आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले.

आज सकारात्मक भावनेची गरज आहे. नकारात्मकता सोडली तर हे जग सुंदर आहे. येथे उपस्थित झालेला हा शांतीदूतांचा रथ पुढे जावा. या कुंभमेळ्यातून विचारांचे झालेले मंथन जगभर पसरावे. या शांतीदूतांनी विश्व बंधूत्त्वाची ज्योत जगभरात पेटवली आहे. कोरोना काळात भारतीय जैन जीवनशैलीने मनुष्य जीवनाला तारले आहे. आयुर्वेद, योग-प्राणायाम, संयम आधारित जीवनशैली पुन्हा प्राप्त करा. बोलणे सोपे आहे आणि कृती कठीण. पण, तो कृती सुकर व्हावी, असे प्रयत्न गरजेचे आहे आणि ते प्रयत्न या परिषदेतून होत असल्याचा आनंद आचार्य डॉ. लोकेशमुनी यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदnagpurनागपूरLokmatलोकमत