शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर १०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:53 IST

मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्रध्वजामुळे रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.

ठळक मुद्देआता लोकार्पणाची प्रतीक्षा : रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्रध्वजामुळे रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. सामान्य माणसापासून ते सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनात तिरंग्याविषयी श्रद्धा, विश्वास आणि अभिमान आहे. हा तिरंगा झेंडा नेहमी नजरेसमोर दिसल्यास नागरिकांच्या मनात सदैव देशभक्तीची भावना वाढत राहील या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर १०० फूट तिरंगा झेंडा उभारण्याची संकल्पना रेल्वे बोर्डाकडे मांडली होती. त्यांच्या संकल्पनेचा विचार करून रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहाणी यांनी देशभरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर १०० फूट उंच तिरंगा ध्वज उभारण्याला मान्यता दिली होती. त्यानुसार नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात आरक्षण कार्यालयाच्या शेजारी गुरुवारी तिरंगा झेंडा उभारण्यात आला. लवकरच या तिरंगा झेंड्याच्या सभोवताल चारही बाजूंनी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. टॉवरवर लावण्यात आलेल्या या झेंड्याच्या वर तीन लाईट आहेत. याशिवाय इतर दोन लाईटचा प्रकाश या राष्ट्रध्वजावर पडणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील दृश्य आकर्षक राहणार आहे.सेल्फी पॉईंटमध्ये भरआरक्षण कार्यालयाच्या शेजारी दर्शनी भागात हिरवळीच्या मधोमध हा राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे. या हिरवळीच्या समोर सेल्फी पॉईंट बनविण्यात येणार आहे. येथून प्रवासी राष्ट्रध्वज आणि रेल्वेस्थानकाच्या हेरिटेज इमारतीसोबत सेल्फी घेऊ शकणार आहेत.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर