११ रोजी मांडणार : मेट्रो रिजन व मेट्रो रेल्वेसाठी तरतूदनागपूर : प नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने हे ११ मार्च रोजी २०१५-१६ चा अर्थसंकल्सादर करणार आहेत. वर्धने यांनी अर्थसंकल्पात तब्बल ९०० कोटींपर्यंत झेप घेतली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मेट्रो रिजन व मेट्रो रेल्वेसाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे.नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात येणारे महापालिकेच्या हद्दीतील सर्व ले-आऊट महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहे. सोबतच नुकतेच राज्य सरकारने मेट्रो रिजनचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करीत त्यावर आक्षेप व सूचना मागविल्या आहेत.भविष्यात एमएमआरडीएच्या धर्तीवर नासुप्रचे रूपांतर एनएमआरडीएमध्ये करण्याचीही चर्चा सुरू आहे. हे सर्व पाहता नासुप्रच्या अर्थसंकल्पात मेट्रो रिजनच्या विकासावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. मेट्रो रेल्वे हा नासुप्रसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी नासुप्र नोडल एजंसी आहे. मेट्रो रेल्वेचे कार्यालयही सुरू झाले आहे. नव्या कार्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच बांधकाम सुरू होणार आहे. यासाठीही नासुप्रतर्फे भरीव निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी यासाठी ७५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. अविकसित ले-आऊटला मिळेल का न्याय? ५७२ व १९०० ले-आऊटमधील विकास कामांसाठी नागरिकांकडून गोळा करण्यात आलेले विकास शुल्क संपले आहे. विकास कामांसाठी निधी नाही, असा दावा वेळोवेळी नासुप्रकडून केला जातो. त्यामुळे वर्धने या अर्थसंकल्पात अविकसित ले-आऊटच्या विकासासाठी किती निधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी अनधिकृत ले-आऊटच्या विकासासाठी ६४ कोटी रुपये देण्यात आले होते.
नासुप्रचा अर्थसंकल्प ९०० कोटींवर!
By admin | Updated: March 10, 2015 02:24 IST