शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी रडत आहेत, गुलाम नबी आझाद यांची टीका, सरकारविरोधात हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारविरुद्ध नागपूर विधिमंडळावर काढलेल्या जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चात आझाद बोलत होते.ते म्हणाले, मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या कथित बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी सैन्यप्रमुख, राजदूत, विदेश सचिव आदींनी पाकिस्तानसोबत हातमिळवणी करून सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप मोदींनी केला आहे. अशा पंतप्रधानांवर मला शरम वाटते. गुजरातेत पराभव दिसू लागताच त्यांची एवढी पातळी खालावली? बिहारच्या निवडणुकीतही पराभव दिसू लागला असताना ‘नितीश जितेगा, तो पाकिस्तान मे जश्न मनेगा’ असे मोदी म्हणाले होते. आता तेच नितीशकुमार मोदींच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हा पाकिस्तानात जल्लोष झाला का, असा सवालही त्यांनी केला.पंतप्रधान मोदी हे एकतर कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुकीत व्यस्त असतात, नाहीतर विदेशात असतात. आम्ही त्यांना कधी जपान, जर्मनी, अमेरिकेत शोधायचे, तर कधी आसाम, बिहार, उत्तर प्रदेशात शोधायचे. ते पंतप्रधान म्हणून देशासाठी कधी काम करतात, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधानांसह भाजपाचे मुख्यमंत्री, मंत्री हे दोन-दोन महिने निवडणुका असलेल्या राज्यात डेरा टाकतात. भाजपाचे सरकार हे आता निवडणुका लढविण्याची मशिन झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.जो भाजपाला साथ देत नाही त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. जो भाजपाच्या धोरणांचा विरोध करतो त्याला दहशतवादी ठरविले जात आहे, असे सांगत भाजपाच्या या भूमिकेपासून सतर्क राहा, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली - दर्डाशेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न घेऊन ‘लोकमत’च्या माध्यमातून आम्ही लढत आहोत. संपूर्ण राज्य आणि देश शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाने अस्वस्थ असताना काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून या प्रश्नांना वाचा फोडली आहे. शेतकºयांची सर्वच स्तरांवर कुचंबना होत आहे. त्याचा कुणी वाली नाही. राहुलजी आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली या देशातील गरीब, दलित, शोषित, वंचितांचे प्रश्न सुटायला मदत होईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विजय दर्डा यांनी जनआक्रोश-हल्लाबोल रॅलीचा शुभारंभ करताना व्यक्त केला.दोन्ही काँग्रेस एक होऊ शकतात : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष असले तरी त्यांची विचारसरणी एकच आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही पक्ष एकच होतील, अशी भविष्यवाणी आझाद यांनी या वेळी केली.

टॅग्स :nagpurनागपूर