शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅनोटेक्नॉलॉजी’तून शुद्ध होणार पाणी, तेल, धातू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:24 IST

तंत्रज्ञान क्रांतीमध्ये ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा मौलिक वाटा असून या माध्यमातून अनेक अशक्यप्राय बाबी प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. याच ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा उपयोग करून ‘व्हीएनआयटी’तील सहयोगी प्राध्यापक डॉ.श्रीराम सोनवणे यांनी शुद्धीकरणासंदर्भात एक मोठा शोध लावला आहे.

ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’तील श्रीराम सोनवणे यांचा शोध‘अ‍ॅसिड’, ‘अल्कोहोल’सह विरघळलेल्या घटकांचीदेखील शुद्धीकरण प्रक्रिया होणार सोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञान क्रांतीमध्ये ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा मौलिक वाटा असून या माध्यमातून अनेक अशक्यप्राय बाबी प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. याच ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा उपयोग करून ‘व्हीएनआयटी’तील सहयोगी प्राध्यापक डॉ.श्रीराम सोनवणे यांनी शुद्धीकरणासंदर्भात एक मोठा शोध लावला आहे. त्यांच्या संशोधनामुळे आता या तंत्रज्ञानाचा वापर करून जल, तेल व धातूंसह ‘अ‍ॅसिड’, ‘अल्कोहोल’सह विरघळलेल्या घटकांचे शुद्धीकरण करणे शक्य झाले आहे. ही प्रक्रिया उद्योगक्षेत्रासाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे त्यांना या संशोधनाचे ‘पेटंट’देखील मिळाले आहे. 

प्रत्येक औद्योगिक उत्पादनाच्या प्रकल्पामध्ये पृथक्करण आणि शुद्धीकरण प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची असते. विविध मौल्यवान धातू, तेल तसेच पाणी यांच्यामध्ये ‘कम्पाऊन्ड्स’, ‘मेटल कॉम्प्लेक्स’ इत्यादींचा समावेश असतो. त्यांचे शुद्धीकरण करणे ही अतिशय किचकट प्रक्रिया असते. सद्यस्थितीत रासायनिक प्रक्रिया उद्योगांत काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र यातून ५० ते ६० टक्केच शुद्धीकरण होऊ शकते. शिवाय यासाठी खर्चदेखील बराच जास्त लागतो. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून डॉ.सोनवणे यांनी संशोधनाला सुरुवात केली.डॉ.सोनवणे यांनी याअगोदर ‘नॅनो कॉम्पोसाईट्स’, ‘नॅनोफ्लूइड्स’ यावर संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांनी ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा वापर करूनच नवीन प्रक्रिया करण्याचा निश्चय केला. अगोदर ‘रँडम पॅकिंग’ वापरले जायचे. मात्र यात दोन वेगवेगळे पदार्थ एकमेकांमध्ये मिश्रित होण्याचा धोका होता. ‘नॅनो पार्टिकल’ कोणत्याही द्रव पदार्थात सहजपणे मिश्रित होत नाही. त्यांचाच उपयोग करण्याचे डॉ.सोनवणे यांनी ठरविले. सुमारे वर्षभर त्यांचे प्रयोगशाळांमध्ये प्रयोग चालले. काहीवेळा अडथळेदेखील आले. मात्र त्यांची जिद्द कायम होती. त्यातूनच त्यांनी यश खेचून आणले व ‘नॅनो पॅकिंग एक्स्ट्रॅॅक्शन’ प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेतून १०० टक्क्यांच्या जवळपास शुद्धीकरण शक्य झाले आहे. या प्रक्रियेत त्यांना राहुल शर्मा यांचेदेखील योगदान लाभले.‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा पुरेपूर वापर हवा‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा अद्याप पूर्णपणे वापर केला जात नाही आणि रासायनिक प्रक्रियेचा खर्च कमी करण्याची ‘नॅनो टेक्नॉलॉजी’मध्ये प्रचंड क्षमता आहे. उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड न करता रासायनिक प्रक्रियेतील जटीलता कमी व्हावी, अशी उद्योगक्षेत्राची मागणी असते. शुद्धीकरणाची प्रक्रिया सोप्या प्रकारे व्हावी, हा माझा मानस होता. त्यात यश मिळाले याचे समाधान आहे. या शोधामुळे शुद्धीकरण प्रक्रियेची जटीलता आणि एकूण किंमत कमी होणार आहे. याचा थेट उत्पादन खर्च कमी होण्यासाठी फायदा होईल, असे डॉ.श्रीराम सोनवणे यांनी सांगितले. भारत सरकारच्या प्रकल्पांवरदेखील ते काम करीत आहेत.अशी आहे प्रक्रियाडॉ.श्रीराम सोनवणे यांनी ‘नॅनोसाईज्ड पॅकिंग’ सामग्रीचा संशोधनात वापर केला. या सामग्रीमुळे वस्तूमान हस्तांतरणाचा दर वाढतो. त्यामुळे प्रत्यक्ष ‘ऑपरेशन’ची कार्यक्षमता वाढते. ‘नॅनोपॅकिंग मटेरियल’चे वस्तूमान बदलून ‘ऑपरेशन’ची कार्यक्षमता नियंत्रित करता येऊ शकते. या प्रक्रियेत दोन द्रव पदार्थांना एकत्र केले जाते. यात प्रामुख्याने जलीय द्रव व सेंद्रिय द्रव तसेच ‘नॅनो पार्टिकल’ सामग्री असते. ‘एक्सट्रॅक्शन कॉलम’मधील दोन्ही पदार्थांच्या या संवादामुळे द्रवक प्रथम द्रवातून दुसऱ्या द्रव पदार्थात हस्तांतरित होतो. ‘नॅनोपार्टिकल मटेरियल’ची भर घालण्यामुळे वस्तूमान हस्तांतरण दर वाढतो. या वाढीव वस्तू-हस्तांतरण दरामुळे एकूण प्रक्रियेची कार्यक्षमता वाढते.संशोधनाचा असा होऊ शकतो फायदा

  • अन्न उद्योगात, डीएनए शुद्धीकरण, अमाईन शुद्धीकरण या ठिकाणी या संशोधनामुळे मोठा फायदा होऊ शकतो.
  • या प्रक्रियेमुळे फिनोल्स, अनिलीन आणि नायट्रेटेड अरोमेटिक्स यासारख्या गोष्टी सहजपणे सांडपाण्यातून काढल्या जातात.
  • सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेत याचा वापर होऊ शकतो.
  • उद्योगांमध्ये पाण्याचा अधिक कार्यक्षमतेने परत वापर होऊ शकतो.
  • उद्योगांमध्ये कोबाल्ट, तांबे, निकेल, जस्त, प्लॅटिनम विविध पदार्थांतून वेगळे होऊ शकतात.
  • शुद्धीकरण प्रक्रिया स्वस्तात होणे शक्य
  • शाई, परफ्युम उद्योगांत ‘अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड’ वेगळे काढणे शक्य.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानWaterपाणी