शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदा जिचकार नव्या महापौर

By admin | Updated: March 2, 2017 02:20 IST

नागपूरच्या नव्या महापौर नंदा जिचकार तर उपमहापौर दीपराज पार्डीकर हे असतील.

मनपाचे कारभारी ठरले रविवारी विशेष सभेत निवड काँग्रेस,बसपाही लढणार नागपूर: नागपूरच्या नव्या महापौर नंदा जिचकार तर उपमहापौर दीपराज पार्डीकर हे असतील. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव तर सत्तापक्षनेते म्हणून संदीप जोशी जबाबदारी पार पाडतील. भाजपचे निरीक्षक व प्रभारी आ. अनिल सोले यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित भाजप नगरसेवकांच्या बैठकीत यासंबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संमतीने ही निवड करण्यात आली आहे. रविवारी महापालिकेची विशेष सभा आहे. तीत महापौर-उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. अल्पमतात असलेल्या काँग्रेस व बसपानेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी स्नेहा विवेक निक ोसे यांनी तर उपमहापौर पदासाठी नितीश ग्वालबंशी यांनी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बसपातर्फे महापौर पदासाठी वंदना चांदेकर यांनी तर उपमहापौर पदसाठी नरेंद्र वालदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली तर शिवसेना मात्र संभ्रमात आहे. भाजपाच्या बाजूने एकतर्फी संख्याबळ असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित असून निवडणूक ही औपचारिकता ठरणार आहे. निवडणुकीनंतर लगेच विजयी महापौर व उपमहापौर पदभार स्वीकारतील. भाजपाने गेल्या दहा वर्षात अडचणीवर मात करून लोकांचा विश्वास संपादन केला. पारदर्शी व विकासात्मक कारभारामुळे लोकांनी निवडणुकीत पुन्हा विश्वास दर्शविला. येणाऱ्या दिवसात नागपूर शहर विकासाच्या बाबतीत नंबर वन होईल, अशी ग्वाही आ. अनिल सोले यांनी दिली. यावेळी मावळते महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, नंदा जिचकार, संदीप जोशी, संदीप जाधव, माजी महापौर माया इवनाते व जयप्रकाश गुप्ता यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षभरात आमदार, पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यामुळे निवडणुकीत महापालिके च्या इतिहासात भाजपला विक्रमी १०८ जागांवर विजय मिळाला. महापालिकेत गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पारदर्शक कारभार व विकासावर मतदारांनी विश्वास ठेवला. या विश्वासाला तडा जाणार नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करू, अशी ग्वाही सुधाकर कोहळे यांनी दिली. (प्रतिनिधी)