शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंना हायकोर्टातही दणका : नियमांचा भंग सिद्ध करू शकले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 19:04 IST

लोकसभा निवडणुकीत मानहानीजनक पराभवाला सामोरे जावे लागलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दणका बसला. मतमोजणीदरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत आपल्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी आणि नियम व मार्गदर्शकत्वांचे काटेकोर पालन करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे, अशा मागण्यांसह पटोले आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दाखल केलेली रिट याचिका अवकाशकालीन न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी गुरुवारी फेटाळून लावली.

ठळक मुद्देयाचिका गुणवत्ताहीन ठरली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत मानहानीजनक पराभवाला सामोरे जावे लागलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दणका बसला. मतमोजणीदरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत आपल्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी आणि नियम व मार्गदर्शकत्वांचे काटेकोर पालन करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे, अशा मागण्यांसह पटोले आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दाखल केलेली रिट याचिका अवकाशकालीन न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी गुरुवारी फेटाळून लावली. ही याचिका गुणवत्ताहीन असल्याचे व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमांचा भंग केल्याचे याचिकाकर्त्यांना सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वत:च्याच स्तरावर सहा खोल्यांमध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक खोलीमध्ये २० याप्रमाणे १२० टेबल्सवर मतमोजणी करण्याचे निश्चित केले. याशिवाय तीन टेबल्स पोस्टल बॅलेट मोजण्यासाठी तर, सहा टेबल्स सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी राहणार आहेत. असे असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पटोले यांच्या केवळ १२४ प्रतिनिधींनाच मतमोजणीच्या टेबल्सवर हजर राहण्याची परवानगी दिली. सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या टेबल्सवर एकाही प्रतिनिधीला मंजुरी देण्यात आली नाही. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी व भारतीय निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले होते, परंतु कुणीच लक्ष दिले नाही. परिणामी, मतमोजणीत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. राज्य सरकारने हे आरोप खोडून काढले व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसारच मतमोजणीची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रफीक अकबानी, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता, राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट तर, भारतीय निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नारायण फडणीस यांनी कामकाज पाहिले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNana Patoleनाना पटोले