शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोले व समर्थकांवर कारवाई होणार? जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:57 IST

सोशल मीडियावर व आमोरासामोर पत्रकारांना धमक्या देणारे, त्यांना बदनामीकारकशिवीगाळ करणारे आणि पारदर्शीपणे वार्तांकन करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्देपत्रकारांना धमकावण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर व आमोरासामोर पत्रकारांना धमक्या देणारे, त्यांना बदनामीकारकशिवीगाळ करणारे आणि पारदर्शीपणे वार्तांकन करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने या दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी पटोले व त्यांच्या समर्थकांच्या निंदास्पद कृतीची गंभीर दखल घेतली आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.पटोले व समर्थकांनी आतापर्यंत पत्रकार सरिता कौशिक, रजत वशिष्ठ, रश्मी पुराणिक, राजीव खांडेकर, राजेश तिवारी, संजय डाफ, गजानन उमाटे, कृष्णा म्हस्के व राजू हाडगे यांना लक्ष्य केले. शिष्टमंडळाने या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. पटोले व त्यांच्या समर्थकांचे पत्रकारांसोबतचे हे वागणे धक्कादायक आहे. पत्रकार नागरिकांपुढे सत्य बाजू मांडत असल्यामुळे झालेला जळफळाट यातून दिसून येतो. पत्रकार अशा भ्याड कृतीला कधीच घाबरणार नाहीत. ते आपल्या कर्तव्यांना सतत न्याय देत राहतील. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला नुकसान पोहचविण्याचे काम पटोले समर्थक करीत आहेत. त्यांच्या या कृतीचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यांची कृती फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे असे शिष्टमंडळाने सांगितले.महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. शिष्टमंडळात सरिता कौशिक, राजेश तिवारी, राजेश टिकले, अभिषेक तिवारी, के. पांडे व मंगेश राऊत यांचा समावेश होता.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMediaमाध्यमेnagpurनागपूर