शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नागपुरात नाल्याची भिंत पडली; घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:03 IST

दक्षिण- पश्चिम नागपुरातील प्रभाग ३५ मधील नरेंद्रनगर लगतच्या बच्चू सिंग ले- आऊट येथील नाल्याची १०० ते १२५ मीटर लांबीची भिंत पडली. यामुळे नाल्याच्या काठावरील आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण- पश्चिम नागपुरातील प्रभाग ३५ मधील नरेंद्रनगर लगतच्या बच्चू सिंग ले- आऊट येथील नाल्याची १०० ते १२५ मीटर लांबीची भिंत पडली. यामुळे नाल्याच्या काठावरील आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. नाल्याला पूर आल्यास कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने परिसरातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.पुराच्या पाण्याने भिंत पडल्यानंतर काठावरील माती वाहून गेल्याने रमेश नागलकर, भरत राठोड,सुरेश पाल, मनीष पाल व भूषण कडू आधीच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच तातडीने भिंत न बांधल्यास समोरील भिंतसुद्धा पडण्याची शक्यता आहे.नाल्याला पूर आल्यास कोणत्याही क्षणी घराच्या भिंती पडण्याची शक्यता आहे. रात्रीच्या सुमारास पूर आल्यास जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या परिसरातील कुटुंबे दहशतीत रात्र काढत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नालेसफाई केली जाते. या नाल्याची जेसीबीने सफाई करताना दगडाची जुनी भिंत नादुरुस्त झाली होती झाली. ही भिंत तातडीने दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील लोकांनी महापालिका झोन कार्यालय तसेच मुख्यालयाकडे केली होती. तसेच नगरसेवकांनाही निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या आलेल्या पुरात दगडाची भिंत पडली.गेल्या महिन्यात बजेरिया मारवाडी चाळ नाल्याची दीडशे मीटर लांबीपर्यंतची भिंत पडली होती. यामुळे आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला.नाल्याच्या भिंतीचे सर्वेक्षण होण्याची गरजनागपूर शहरात २२७ नाले आहेत. या नाल्यांना संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहेत. परंतू मागील काही वर्षांत देखभाला दुरुस्ती झाली नसल्यामुळे त्या तकलादू झाल्या आहेत. पावसाळ्यात पुरामुळे शिकस्त संरक्षण भिंती कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाल्यांच्या भिंतीचे सर्वेक्षण करून शिकस्त भिंती तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका