शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आपली बस’ सेवा तीन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 10:45 IST

नागपूर महापालिकेकडे २७.७२ कोटी थकल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरांनी गुुरुवारी दुपारी अचानक संप पुकारला. तीनतास आपली बस सेवा ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्देमनपा व आॅपरेटरच्या वादात प्रवासी वेठीस२७.७२ कोटी थकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर बससेवा चालविण्यात अपयश आल्याने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि.यांचा करार गेल्यावर्षी रद्द करण्यात आला. शहरातील प्रवांशांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी यासाठी ग्रीनबससह चार नवीन आॅपरेटर नेमण्यात आले़ परंतु महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे वर्षभरानंतरही बससेवा सुरळीत झालेली नाही. महापालिकेकडे २७.७२ कोटी थकल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरांनी गुुरुवारी दुपारी अचानक संप पुकारला. तीनतास आपली बस सेवा ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.बस आॅपरेटर कंपन्यांपैकी हंसा आॅपरेटर कंपनीचे ९ कोटी ६७ लाख, ट्रॅव्हल टाईम कंपनीचे ९ कोटी तर आऱ के़ सिटीबस आॅपरेटरचे ९ कोटी ५ लाख रुपये महापालिकेकडे थकीत आहे़ महापालिकेकडून वेळेवर रक्कम मिळत नसल्याने बस कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देता येत नाही.यामुळे आॅपरेटर्सनी संपाचे हत्यार उगारले. अचानक बससेवा ठप्प पडल्याने शहरातील प्रवासी बस स्थानकावर अडकले. काहींनी जादा पैसे मोजून आॅटोने जाणे पसंत केले. दुपारी ३.३० पासून ६.३० दरम्यान बसेस उभ्या होत्या. अखेर बस आॅपरेटर व परिवहन व्यवस्थापक यांच्यातील वाटाघाटीनंतर तीन आॅपरेटरला प्रत्येकी ५० लाख असे दीड कोटी तात्काळ देण्याचा निर्णय झाल्याने बसेस सुरू झाल्या.

महिन्याला सहा कोटींचा बोजाआपली बससेवा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविणे अपेक्षित आहे. मात्र बससेवा चालविण्यासाठी नियुक्त सर्व आॅपरेटरला दर महिन्याला ११ कोटी रुपये द्यावे लागतात. तर तिकिटांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत महिन्याला सुमारे पाच कोटी जमा होतात. त्यामुळे महिन्याला सहा ते सात कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे़दुसरीकडे बसवरील जाहिराती वा अन्य माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी निर्देश दिल्यानंतरही परिवहन विभाग काहीच करीत नाही, जाहिरात विभागाला उत्पन्न मिळत असल्याचा आरोप परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला़डिझेल संपल्याने बसेस उभ्याडिझेल संपल्याने मोरभवन येथे २० ते २५ बसेस उभ्या होत्या. बसचा संप नव्हता, चर्चेनंतर आॅपरेटरने बसेस सुरू केल्याचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले़ मात्र आॅपरेटर कंपन्यांच्या सांगण्यावरूनच ड्रायव्हर, कंडक्टरला बस थांबविण्याचे निर्देश दिले होते़ अशाप्रकारे नोटीस न देता बस थांबविणे नियमबाह्य असल्यामुळे संघटनेनेच बस ड्रायव्हर, कंडक्टर्सला समजावून बससेवा सुरू केली, असे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी व कर्मचारी संघटनेचे (भारतीय कामगार सेना) सचिव अंबादास शेंडे यांनी सांगितले़सभापतींचा शिवसेनेवर निशाणाशहर बस कर्मचाऱ्यांची संघटना शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार संघटनेच्या नेतृत्वात कार्यरत आहे़ शहर बसच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, यासाठी संघटना लढा देत आहे़ शहर बसचे कर्मचारी महापालिकेचे नसून आॅपरेटरने नियुक्त केलेले आहेत. मोटार ट्रान्सपोर्टमध्ये कार्यरत कर्मचारी व महापालिका कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भात वेगवेगळ्या अधिसूचना आहेत़ त्यामुळे शहर बस कर्मचाऱ्यांकरिता किमान वेतन निश्चिती करण्यासाठी उद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ या खात्याचे मंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई आहे़ परिवहन विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याच पक्षाची संघटना असूनही या विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही असा निशाणा सभापती बंटी कुकडे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना साधला. दुसरीकडे बसवरील जाहिराती वा अन्य माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी निर्देश दिल्यानंतरही परिवहन विभाग काहीच करीत नाही, जाहिरात विभागाला उत्पन्न मिळत असल्याचा आरोप परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला़.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ